kangana ranaut meet Dhirendra Krishna Shastri at ayodhya ram mandir SAKAK
मनोरंजन

Kangana Ranaut: लहान भावाप्रमाणे मारली मिठी... कंगना रणौतने घेतले धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे आशीर्वाद

कंगना रणौतने अयोध्येत गेल्यावर बागेश्वर धाम सरकार यांची भेट घेतली

Devendra Jadhav

Kangana Ranaut meet Dhirendra Krishna Shastri News: अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाचा अभिषेक आज होणार आहे. या मोठ्या सोहळ्यात देशातील अनेक दिग्गज व्यक्ती येथे पोहोचणार आहेत.

कंगना रणौत एक दिवस आधीच अयोध्येला पोहोचली आहे. कंगना गेल्या काही दिवसांपासून अयोध्या राम मंदिराबद्दल विविध पोस्ट करत असते. अशातच अयोध्येत गेल्यावर कंगनाने धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट घेतलीय. कंगनाने या भेटीबद्दल सोशल मीडियावर पोस्ट केलीय.

अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याव्यतिरिक्त कंगना इतर धार्मिक विधींमध्ये भाग घेत आहे. तिने जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली. याशिवाय तिने प्रसिद्ध हनुमानगढ़ी मंदिराला भेट देऊन मंदिर परिसर झाडून घेतला.

कंगना रणौतने नंतर बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचीही भेट घेतली. त्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही मिळाले आहे.

कंगनाने त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला असून धीरेंद्र कृष्ण शास्त्री तिचा लहान भाऊ असल्याचे सांगितले आहे. कंगना म्हणाली पहिल्यांदाच तिला तिच्या वयापेक्षा लहान गुरू मिळाला आहे.

kangana ranaut meet Dhirendra Krishna Shastri at ayodhya ram mandir

कंगना रणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर धीरेंद्र कृष्ण शास्त्रीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्यासोबत इतर अनेक साधू आहेत.

कंगनाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, "मी पहिल्यांदा माझ्या वयापेक्षा लहान गुरुंना भेटले, ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहेत, मला लहान भावाप्रमाणे त्यांना मिठी मारायची इच्छा होती. पण नंतर मला आठवले की कोणी वयाने गुरू बनत नाही, कर्माने गुरु बनतो. गुरुजींच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतले. जय बजरंगबली."

कंगना धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भेटीची चांगलीच चर्चा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT