मनोरंजन

कंगनाची गगनभरारी; 'तेजस'मधील फर्स्ट लूक प्रदर्शित

शर्वरी जोशी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर उघडपणे भाष्य करणारी कंगना लवकरच 'थलायवी' आणि 'तेजस' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती या दोन्ही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. यामध्येच 'तेजस'मधील तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे कंगनाचा वाढदिवस असल्यामुळे या दिवसाचं निमित्त साधून या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. तसंच या चित्रपटात कंगना नव्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये कंगना एअरफोर्स ऑफिसरच्या रुपात दिसून येत आहे.  या चित्रपटामध्ये ती एका धाडसी व साहसी अशा महिला फायटर पायलची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन सर्वेश मेवाड यांनी केलं आहे. 

काही दिवसांपूर्वीच कंगना या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राजस्थानला रवाना झाली होती. त्यामुळे सध्या येथेच या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. 'तेजस' हा चित्रपट २३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, 'तेजस'पूर्वी कंगनाने तिच्या 'धाकड' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. या चित्रपटात कंगना साहसदृश्य करताना दिसून येणार आहे. नुकताच कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेस आमदार असलेल्या वडिलांचं क्रॉस वोटिंग, लेकानं नातं तोडलं; म्हणाला, गद्दारांचा वारसा नको, प्रॉपर्टीतूनही नाव कमी करणार

Chhatrapati Sambhajinagar: महामार्गाच्या दयनीय स्थितीवर हायकोर्टाचा संताप; सरकारला इशारा

Maharashtra Weather Alert : पुढील ३ दिवस धोक्याचे ! राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचे संकट, हवामान खात्याचा इशारा

Modern Indian Art and Artists : अनुभवाच्या शाळेत घडलेला कलाकार; मनीष पुष्कले यांची कलात्मक यात्रा

Chhatrapati Sambhajinagar: घाटीत एआरएस इंजेक्शन उपलब्ध; श्वानदंश रुग्णांना मोठा दिलासा

SCROLL FOR NEXT