Kangana Ranaut on Sunny Deol's Gadar 2 day 1 box office collections omg 2  SAKAL
मनोरंजन

Gadar 2 Kangana Ranaut: गदर 2 च्या बॉक्स ऑफीस कलेक्शनबद्दल कंगना रणौत स्पष्टच म्हणाली...

गदर 2 च्या बॉक्स ऑफीस कलेक्शनबद्दल कंगना स्पष्ट बोललीय

Devendra Jadhav

Kangana Ranaut on Gadar 2 News: सनी देओलचा गदर 2 काल शुक्रवारी ११ ऑगस्टला सगळीकडे रिलीज झालाय. सनी देओलच्या गदर 2 चं बॉक्स ऑफीस कलेक्शन समोर आलंय.

गदर 2 ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफीसवर ४० कोटींचा गल्ला जमवलाय. आजवर झालेली ही सर्वात मोठी ओपनिंग म्हणता येईल. याच गदर 2 च्या बॉक्स ऑफीस कलेक्शनवर कंगना रणौतने तिचं स्पष्ट मत दिलंय.

(Kangana Ranaut on Sunny Deol's Gadar 2 day 1 box office collections omg 2)

कंगनाने शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या गदर 2 ची प्रशंसा केली. कंगना म्हणते, "अक्षय कुमार स्टारर OMG 2 हा सिनेमा त्याच दिवशी प्रदर्शित झाला नसता तर पहिल्या दिवशी गदरने ₹65-70 कोटी सहज कमावले असते."

कंगनाने सनीला म्हटले 'मॅनली हीरो'

कंगना म्हणाली की, "गदर 2 खोटं प्रमोशनशिवाय चांगले काम करत आहे. तिने सनी देओलला 'प्रॉपर मॅनली हिरो' असेही संबोधले. कोणतेही माफियाचे राजकारण नाही, खरेदी केलेल्या समीक्षा नाहीत, बनावट प्रमोशन नाही, मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट बुकिंगद्वारे तिकीट खरेदी नाही, कार्टून दिसणारे कलाकार नाहीत, योग्य नायक आणि योग्य कथा..."

कंगना कौतुक करताना पुढे म्हणाली.. कंगनाने लिहिले, "सुट्टी असली तरीही गदर 2 एकट्याने रिलीज झाला असला तरी, पहिल्या दिवशी त्याने सहज ₹65-70 कोटी असू शकतात.. प्रेक्षक सुद्धा आर्थिक आणि इतर समस्या विसरुन गदर 2 चा आनंद घेत आहेत. लोकांच्या जीवनात उत्साह आणि देशाबद्दल प्रेम परत आणणारा सिनेमा नक्की पहा... तारा सिंग, सनी देओल यांचम नातं चिरंजीव आहे."

जोडून आलेल्या सुट्ट्या आणि गदर 2 ची कमाई

२००१ मध्ये गदरचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता २२ वर्षांनी त्याचा सिक्वेल आला आहे. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. पुढील आठवडा तर गदर 2 ला प्रचंड प्रतिसाद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

१५ ऑगस्ट चे निमित्त आणि भारत पाकिस्तानचा संदर्भ यामुळे गदर 2 जोरदार कमाई करेल असे बोलले जात आहे. OMG 2 विषयी बोलायचे झाल्यास त्याचा पहिला भाग हा २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT