12th Fail Actor Vikrant Massey Praised By Kangana Ranaut esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: कंगनाचा 'यू टर्न'! कोणे एकेकाळी म्हटलं होतं झुरळ, आता त्याच्याच गळ्यात घातली कौतुकाची माळ

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

12th Fail Actor Vikrant Massey Praised By Kangana Ranaut : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिला तिच्या बोलण्यामुळे अनेकदा ट्रोलही व्हावे लागले आहे. पण कुणाचं न ऐकणारी कंगना ही बॉलीवूडमधील सर्वाधिक वादग्रस्त सेलिब्रेटींपैकी एक म्हणूनही परिचित आहे.

आता कंगनानं चक्क विक्रांत मेस्सीचे कौतुक केले आहे. काही वर्षांपूर्वी या दोन्ही सेलिब्रेटींमध्ये एका कारणावरुन मोठा वाद झाला होता. तेव्हा कंगणानं तिच्या एका पोस्टमधून त्याच्यावर हल्लाबोल केला होता. आता तिनं त्याच्या १२ वी फेल या चित्रपटाचे कौतुक केले आहे. काय म्हणाली कंगना हे आपण जाणून घेणार आहोत.

कंगनानं तिच्या इंस्टावर ती स्टोरी शेयर करताना म्हटले आहे की, विधु सर तुम्ही जी कलाकृती तयार केली आहे ती पाहून खूपच आनंद झाला. त्या चित्रपटानं जिंकून घेतलं. विक्रांतनं जे काम केले ते प्रभावी आहे. अद्भुत म्हणावी अशी ती भूमिका आहे. तुमच्या प्रतिभेला सलाम. अशा शब्दांत तिनं विक्रांतवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. २०२१ मध्ये कंगनानं विक्रांतवर एक पोस्ट केली होती. त्यावरुन वादही झाला होता.

त्यावेळी कंगनानं विक्रांतला झुरळ म्हटलं होतं. हे सगळं प्रकरण अभिनेत्री यामी गौतमशी संबंधित होतं. जेव्हा यामीनं तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते तेव्हा विक्रांतनं त्या फोटोंची तुलना राधे मॉ सोबत केली होती. त्यावेळी कंगना नाराज झाली होती. तिनं म्हटलं होतं की, हे झुरळ आलं कुठून? माझी चप्पल घेऊन या...

kangana post on 12th fail

१२ वी फेल विषयी बोलायचं झाल्यास विधु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटामध्ये सनदी अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची संघर्षमय गाथा उलगडण्यात आली आहे. वास्तविक घटनांवर आधारित या चित्रपटानं कित्येक बॉलीवूड सेलिब्रेटींना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडल्याचे दिसून आले आहे. केवळ २० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे.

१२ वी फेल हा चित्रपट आता ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे. ज्या ओटीटीवर हा चित्रपट आला त्या डिझ्नी हॉटस्टार सर्वाधिक व्ह्यूज मिळालेला चित्रपट म्हणून त्याची वेगळी तयार झाली आहे. नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : माझ्यामुळेच भारत अन् पाकिस्तानचे अणुयुद्ध टळले; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

Latest Maharashtra News Updates : गणेशोत्सवानिमित्त गावाकडे जाण्यासाठी कोकणवासीयांची स्वारगेट बस स्थानकात मोठी गर्दी

Ganesh Festival 2025: गणेशोत्‍सवासाठी तगडा बंदोबस्‍त; पोलिस, होमगार्ड, एसआरपीएफ जवानांसह साडेआठ हजार जण तैनात

Ajit Pawar : रक्षाबंधन झाले आता भाऊबीज होईल, अजित पवारांचा शब्द; मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत

Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलन! 'सोलापुरातून २५ हजार वाहने निघणार मुंबईकडे'; आझाद मैदानावर समाजबांधवांचे वादळ धडकणार

SCROLL FOR NEXT