Kangana Ranaut,Nawazuddin siddiqui
Kangana Ranaut,Nawazuddin siddiqui  Google
मनोरंजन

Kangana Ranaut: 'काय बदमाश आहे ही..', नवाझुद्दीनच्या पत्नीवर भडकली कंगना रनौत

प्रणाली मोरे

Kangana ranaut: नवाझुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीनं काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात नवाझुद्दीन आणि तिच्यात काहीतरी बाचाबाची सुरू आहे. व्हिडीओत नवाझुद्दीन घराच्या बाहेरील गेटवर उभा आहे. आलिया आतमध्ये बसून बोलत आहे.

आलियानं नवाझुद्दीन आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. कंगनानं यासंदर्भात आता इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तिनं लिहिलं आहे की, ''किती दुःख होत आहे हे सगळं पाहून..नवाझला त्याच्याच घराजवळ अपमानित केलं जात आहे''.

''त्यानं आपल्याकडे जे होतं ते सगळं कुटुंबासाठी खर्ची केलं,कितीतरी वर्ष भाड्याच्या घरात राहिला..तनू वेड्स मनूच्या सेटवर तो रिक्षानं यायचा..आता गेल्या वर्षीच तर हा एवढा मोठा बंगला बांधला..सगळं नीट होतंय इतक्यात हे सगळं घडलं..खूप वाईट वाटतंय नवाझसाठी हे सगळं पाहिल्यावर''.

कंगनानं लिहिलं आहे, ''नवाज साहेब आतापर्यंत जे सगळं कमावलं होतं ते आपल्या भावांना दिलंत. पूर्वाश्रमीची पत्नी(आलिया) जिला कितीतरी वर्ष आधी घटस्फोट दिला होता. ती मुलांसोबत दुबईत राहत होती.तिच्यासाठी मुंबईत एक फ्लॅट खरेदी केला. आणि आपल्या आईसाठी बंगला खरेदी केला''.

'' त्यांनी माझ्याकडूनही घराला सजवण्यासाठी खूप टीप्स घेतल्या. आम्ही सर्वच नवाझच्या या बंगल्यासाठी खूप उत्सुक होतो. आम्ही मिळून नवाझच्या या नव्या बंगल्यात हाऊस पार्टी एन्जॉय केली आहे''.(Kangana Ranaut reacted after nawazuddin siddiqui wife aaliya shared secret video)

Kangana Ranaut reacted after nawazuddin siddiqui wife aaliya shared secret video
Kangana Ranaut reacted after nawazuddin siddiqui wife aaliya shared secret video

कंगना पुढे म्हणाली,''मी नवाझच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला कधीच भेटले नाही पण अचानक तिनं बंगल्यावर आपला हक्क सांगितला हे माझ्यासाठी धक्कादायक आहे. आणि नवाझलाच बंगल्यात येऊ देत नाही हे थोडं विचित्रच आहे''.

''मी पाहिलं नवाझ रस्त्यावर उभे आहेत आणि ती बाई एवढ्या मोठ्या स्टारचा व्हिडीओ बनवतेय..किती बदमाश बाई आहे..मला हे पाहून रडायला येतंय..अभिनय करून पैसे कमावणं सोपी गोष्ट नाहीय,कलाकार यासाठी खूप मेहनत करतात..ती बाई असं कसं काय करू शकते.घराच्या मालकालाच बाहेर काढून घराचं दार बंद करून घेते म्हणजे काय''.

कंगनानं पुढे लिहिलं आहे की,''मी संबंधित अधिकाऱ्यांना ही विनंती करु इच्छिते की तिला लगेचच तिच्या अपार्टमेंटमध्ये राहण्यास पाठवावं जे नवाझ सरांनी तिला खरेदी करुन दिलं आहे. तिथे जाऊन तिच्या ज्या मागण्या आहेत त्या तिनं कायदेशीर मार्गाने जाऊन पूर्ण करून घ्याव्यात''.

''ती नवाझच्या म्हाताऱ्या आईला धमकाऊ नाही शकत,जी अजूनही बंगल्याच्या आत बंदी आहे. आणि आपल्या मुलाची वाट पाहतेय. नवाझची पूर्वाश्रमीची पत्नी आलिया घरात कुणाला येऊ देत नाहीय''.

'' खूप आधी खरंतर यांचा घटस्फोट झाला आहे. आता नवाझनं कमावलेल्या प्रॉपर्टीवर तिचा अधिकार नाही. ती अशापद्धतीनं दोघांमध्ये जे बोलणं होतंय त्याचा व्हिडीओ बनवून नवाझला बदनाम करू शकत नाही. हे खूप चूकीचं आहे''.

आलिया आणि नवाझुद्दिन मध्ये वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा ती आपल्या मुलांना दुबईहून मुंबईत घेऊन आली. पोलिसांच्या मते आलियाचा नवाझुद्दीनची आई मेहरुनिसा सिद्दिकीसोबत संपत्तीवरनं वाद झाला होता. मेहरुनिसा यांनी आलिया विरोधात तक्रारही दाखल केली होती. ज्यानंतर आलियानं आपल्याला त्रास दिला जातोय अशी बातमी सगळीकडे पसरवली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT