Kangana Ranaut To Do Ravan Dahan At Delhi’s Iconic Lav Kush Ramlila 
मनोरंजन

Kangana Ranaut: देशाचे पंतप्रधान नव्हे तर कंगना राणौत करणार रावण दहन! रचणार नवा इतिहास

Kangana Ranaut to Do Ravan Dahan at Delhi’s Iconic Lav Kush Ramlila: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या ती तिच्या आगामी सिनेमा 'तेजस' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Vaishali Patil

Kangana Ranaut To Do Ravan Dahan At Delhi’s Iconic Lav Kush Ramlila: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही नेहमीच चर्चेत असते. मात्र सध्या ती तिच्या आगामी सिनेमा 'तेजस' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

ती या चित्रपटात एअरफोर्स ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती नुकतीच बिग बॉसच्या घरात दिसली होती. मात्र आता कंगना वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

'तेजस' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेगवेगळ्या शहरांना भेट देणारी कंगना आता दिल्लीत लाल किल्ल्याच्या मैदानावर होणार्‍या प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये सहभाग घेणार आहे.

इतकच नाही तर कंगना 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीत 'दसरा' उत्सवात रावण दहनात सहभागी होणार आहे. तर यावेळी रावण दहन कंगनाच्या हस्ते होणार असल्याचा दावा मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात आल आहे.

दिल्लीतील प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये बडे सेलिब्रिटी आणि राजकारणी नेहमीच रावण दहनवेळी सहभागी असतात.

जर कंगनाने रावण दहन केले तर ती असं करणारी पहिली महिला ठरणार आहे. रावण दहन करत कंगना इतिहास रचणार आहे.

रिपोर्टनुसार, दरवर्षी देशाचे पंतप्रधान रावण दहन करतात, मात्र यावर्षी पीएम मोदी निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने ही संधी कंगनाला मिळणार असल्याची चर्चा आहे.

यावेळी लवकुश रामलीला समितीने रामलीलासाठी सर्व स्तरातील महिलांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यात कंगनाचे नावही समील करण्यात आले आहे.

नवरात्रीनंतर दसऱ्याला रावणाचे दहन करण्याची परंपरा आहे, ज्यामध्ये बाण मारून रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. आता ही जबाबदारी बॉलिवूडची क्विन कंगनाला मिळणार अशी चर्चा आहे.

कंगना राणौतच्या आगामी 'तेजस' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग दिल्लीत आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कंगनाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अनेक भारतीय हवाई दलाचे अधिकारी यांची भेट घेतली. त्याचे फोटोही तिने सोशल मिडीयावर शेयर केले होते.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची 'चंद्रमुखी 2' चित्रपटात दिसली होती आता ती तेजस गिल नावाच्या भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याची भुमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. हा सिनेमा 27 ऑक्टोबरला रिलिज होणार आहे. या व्यतिरिक्त ती 'इमर्जन्सी' या चित्रपटही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT