Prasad - Amruta: "चांदीच्या ताटात पुरणपोळी..", देशमुख कुटुंबाने केलं प्रसादचं केळवण, अमृताने घेतला खास उखाणा

देशमुख कुटुंबाने दिलेल्या केळवणात अमृताने प्रसादसाठी खास उखाणा घेतलाय
prasad jawade and amruta deshmukh kelvan by deshmukh family and take ukhana
prasad jawade and amruta deshmukh kelvan by deshmukh family and take ukhana SAKAL

Prasad Jawade - Amruta Deshmukh News: प्रसाद जवादे - अमृता देशमुख सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दोघे अनेकदा एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो शेअर करत असतात. प्रसाद - अमृता या दोघांची लगीनघाई सध्या जोरात सुरु आहे.

दोघेही मित्र आणि नातेवाईकांच्या घरी केळवणाचा आनंद घेत आहेत. अशातच प्रसाद - अमृता यांचं देशमुख कुटुंबाने केळवण झालंय. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

prasad jawade and amruta deshmukh kelvan by deshmukh family and take ukhana
Dharmaveer 2: आणि टेंभीनाक्यावर आनंद दिघे पुन्हा अवतरले, लोकांचा डोळ्यावर विश्वास बसेना, व्हिडीओ व्हायरल

केळवणात अमृताने घेतला खास उखाणा

प्रसाद जवादे - अमृता देशमुख हे दोघे सध्या केळवणाचा आनंद घेत आहेत. अमृताच्या देशमुख कुटुंबाने प्रसाद - अमृताचं केळवण केलं. अमृताने खास निळ्या रंगाची साडी नेसली होती. तर प्रसादने लाल रंगाचा कुर्ता. दोघांचा जोडा अगदी शोभुन दिसत होता.

हे फोटो पोस्ट करत अमृताने खास उखाणा असलेला कॅप्शन शेअर केलाय.

चांदीच्या ताटात पुरणपोळी.. पुरणपोळीमध्ये जायफळ.. प्रसादचं नाव घेतेय देशमुखांचं शेंडेफळ !

या तारखेला प्रसाद - अमृता करणार लग्न

काही दिवसांपुर्वी प्रसाद - अमृताने साखरपुड्याते फोटो शेयर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिलयं की, 'आमचा साखरपुडा झाला आहे, आम्ही अधिकृतपणे कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना नॉमिनेट करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही टास्कला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. असं हटके कॅप्शन त्यांने या फोटोला दिलं आहे.

या पोस्टसोबत त्यांनी त्याच्या लग्नाची तारीखही प्रेक्षकांसोबत शेयर केली होती. हे दोघं येत्या 18 नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com