Kangana and Akshay 
मनोरंजन

'जली ना, तेरी जली ना?'; पॉपस्टार रिहानाशी 'पंगा' घेणाऱ्या कंगनावर भन्नाट मीम्स व्हायरल

सकाळवृत्तसेवा

राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ६९ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत अद्याप काही ठोस निर्णय घेतला जात नसून या आंदोलनाला जागतिक पातळीवर पाठिंबा मिळतोय. 'आपण याविषयी का बोलत नाही आहोत', असा सवालच सुप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने ट्विटद्वारे केला. रिहानाचं हे ट्विट क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि नेटकऱ्यांमध्ये त्याची चर्चा सुरू झाली.

या चर्चेत अभिनेत्री कंगना रणौतनेही उडी घेतली. रिहानाला उत्तर देताना कंगनाने तिला 'मूर्ख' म्हणत आंदोलन करणार शेतकरी नसून दहशतवादी असल्याचं म्हटलं. नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी कंगना या ट्विटमुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल झाली.

'या आंदोलनाबाबत कुणी काहीच बोलत नाहीये कारण ते शेतकरी नाही तर दहशतवादी आहेत, जे भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून चीन भारताचा ताबा घेऊ शकेल आणि अमेरिकेप्रमाणे भारतात चीनी वसाहत स्थापन करू शकेल. तू गप्प बस मूर्ख मुली, तुझ्यासारख्या बनावट लोकांसारखं आम्ही आमचा देश विकायला काढला नाहीये', अशा शब्दांत कंगनाने रिहानावर टीका केली. कंगनाच्या या ट्विटवरून सोशल मीडियावर अनेक हास्यास्पद मीम्स व्हायरल होत आहेत. 

जगाच्या पाठीवर कुठेही काहीही घडलं तरी कंगनाला बोलायचंच असतं, अशा आशयाचं मीम एकाने पोस्ट केलं तर एका चित्रपटातील अक्षय कुमारच्या संवादावरूनही कंगनाला ट्रोल करण्यात आलं.

रिहानासोबतच स्वीडीश पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, असं ट्विट तिने केलं आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Messi in Vantara: मेस्सीची माधुरी हत्तीणीसोबत भेट? पिल्लांसोबत खेळला फुटबॉल... वनतारा’ मध्ये काय घडलं?

IPL 2026 Auction : रिषभ पंतच्या संघाकडून मोठी चूक; ४ सामन्यांसाठी मोजले ८.६० कोटी; कॅमेरून ग्रीनपेक्षा 'या' खेळाडूचा झालाय फायदा

Latest Marathi News Live Update : लातुरात काँग्रेसच्या माजी महापौर आणि माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेश

ठाकरे बंधू दाखवणार ताकद! युतीबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती, घोषणेची वेळ ठरली

VIDEO : सेवागिरी यात्रेत बैलगाडा शर्यतीचा थरार; शाहिद मुलानींच्या बैलजोडीने जिंकला 'पुसेगाव हिंदकेसरी' किताब, तब्बल 1100 बैलगाड्यांचा सहभाग

SCROLL FOR NEXT