मुंबई- सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण दिवसेंदिवस वाढतंच चाललं आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत ३५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र तरीही त्याच्या आत्महत्येचं कारण अजुन स्पष्ट झालेलं नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी कंगनाची देखील चौकशी होणार असं सांगण्यात येत होतं मात्र नुकतंच अभिनेत्री कंगना रनौतने स्पष्ट केलं आहे की तिला मुंबई पोलिसांकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाहीये.
अभिनेत्री कंगना रनौत सोशल मिडियावर नाहीये मात्र कंगनाच्या टीमकडून तिचे अपडेट शेअर केले जातात. कंगनाच्या टीमने हा खुलासा केला आहे की सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात कंगनाला जबाब नोंदवण्याची इच्छा आहे मात्र मुंबई पोलिसांकडून तिला याबाबत कोणताच प्रतिसाद मिळत नाहीये. कंगना रनौतच्या टीमने सोशल मिडियावर एक पोस्ट केली आहे.
या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'कंगनाला अधिकृतरित्या चौकशीची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. रंगोली गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिसांसोबत संपर्कात आहे. कंगनाला तिचा जबाब नोंदवायचा आहे मात्र आम्हाला मुंबई पोलिसांकडून कोणतंच उत्तर मिळत नाहीये.' या पोस्टसोबत पोलिसांसोबतच्या चॅटचा एक स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला आहे.
हा रंगोलीसोबतच्या चॅटचा स्क्रीनशॉट आहे. यात दिसून येतंय की पोलिसांचे प्रश्न मिळाल्यानंतर कंगना तिचा जबाब नोंदवायला तयार आहे. मुंबई पोलिस सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात आत्तापर्यंत जवळपास ३५ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये सुशांतच्या कुटुंबियांसोबतंच बॉलीवूडचे कलाकार, दिग्दर्शक आणि पत्रकारांचा देखील समावेश आहे.
kangana wants to record statement but police is not responding reveals her team with screenshots
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.