Kangana Ranaut On Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: Esakal
मनोरंजन

Kangana Ranaut: '250 कोटी खर्च करुन 'डेली सोप' बनवला..','रॉकी और रानी की प्रेम कहानी' पाहिल्यानंतर कंगनानं करण जोहरची काढली लाज

करण जोहरचा चित्रपट आणि त्यातच आलिया अन् रणवीर असल्यावर कंगना गप्प कशी बसणार तिनं लांबलचक पोस्ट शेयर करत या चित्रपटबाबत तिचं मत व्यक्त केलं.

Vaishali Patil

Kangana Ranaut On Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा रोमँटिक चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' शुक्रवारी रिलिज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. करण जोहरने तब्बल सात वर्षांच्या ब्रेकनंतर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

आता बॉलिवूडची पंगा क्विन कंगना रणौत हिने या चित्रपटावर रिव्ह्यू दिला आहे. करण जोहरचा चित्रपट आणि त्यातच आलिया अन् रणवीर असल्यावर कंगना गप्प कशी बसणार तिनं लांबलचक पोस्ट शेयर करत या चित्रपटबाबत तिचं मत व्यक्त केलं. तिने तिच्या पोस्टमध्ये बॉलिवूडवर , करणवर आणि रणवीरवर टिकेचे बाण सोडले आहे.

कंगना तिच्या पोस्टमध्ये लिहिते की, 'भारतीय प्रेक्षक अण्वस्त्रांची उत्पत्ती आणि अणुविज्ञानावरील तीन तासांचा चित्रपट पाहत आहेत आणि इथे नेपो गँगचं तेच सास बहूचं रडगाणं, पण त्यांना हा डेली सोप ड्रामा बनवण्यासाठी 250 कोटींची गरज का?

करण तुला लाज वाटली पाहिजे तोच चित्रपट पुन्हा बनवायला. स्वत:ला भारतीय चित्रपटसृष्टीचा झेंडा मिरवणारा म्हणतोस आणि सातत्याने त्याचा दर्जा घसरवत आहेस. उगाच पैसे वाया घालु नको.. चित्रपटसृष्टीसाठी ही वेळ चांगली नाही. निवृत्ती घे आणि तरुण चित्रपट निर्मात्यांना काही तरी नवीन आणि क्रांतिकारी चित्रपट बनवू दे.'

Kangana Ranaut On Rocky Aur Rani Kii Prem Kahaani

यात तर तिने करण जोहरचा क्लास घेतला मात्र पुढच्या स्टोरीत तिनं रणवीर सिंगलाही धारेवर धरलं. तिनं पोस्टमध्ये लिहिलं की, 'रणवीरला माझा प्रामाणिकपणे एक सल्ला आहे की करण जोहर आणि त्याच्या ड्रेसिंग सेन्सनं प्रभावित होणं आता थांबव. आता सामान्य माणसांप्रमाणे कपडे परिधान कर जसं धर्मेंद्र किंवा विनोद खन्ना जी त्याच्या काळात करत होते.'

'कृपया जरा त्या दक्षिणेतील सर्व हिरोंकडे पहा, ते कसे कपडे घालतात आणि स्वत: ला मोठ्या सन्मानाने दाखवतात. ते मर्दासारखे आणि प्रतिष्ठित दिसतात. ते लोक आपल्या देशातील संस्कृती नष्ट करत नाहीत. भारतातील लोक कार्टून सारख्या दिसणाऱ्या लोकांना ओळखत नाही जे स्वत: ला हिरो बोलतात.' सध्या कंगनाची ही पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. अनेक नेटकरी तिच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहे.

आता करण आणि रणवीरची यावर काय प्रतिक्रिया असेल हे पहावं लागेल. मात्र दुसरीकडे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आणि चित्रपटाला चांगला प्रतिसादही मिळत आहे. चित्रपटाने रिलिजच्या पहिल्या दिवशी 11.10 कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT