kangana ranaut  instagram
मनोरंजन

पद्मश्री मिळताच कंगनाचं ट्रोलरला सडेतोड उत्तर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कंगनाला सन्मानपत्रासह पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड क्वीन कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. तर ट्विटरवरून सस्पेंड झाल्यानंतर ती सध्या इंस्टाग्रामवर सक्रीय असते. कंगनाला काल (८ नोव्हेंबर २०२१) पद्मश्री पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनाला सन्मानपत्रासह पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने तिच्या ट्रोलरला प्रत्युत्तर देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

कंगनाचा पोस्ट केलेला व्हिडिओ;

आपला आनंद व्यक्त करत कंगना म्हणाली, "मित्रांनो, एक कलाकार असल्याने मला खूप प्रेम, आदर, पुरस्कार मिळाले. पण आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला एक आदर्श नागरिक म्हणून मला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. मी या देशाची, या सरकारची ऋणी आहे. मी लहान वयात माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा मला फार काळ यश मिळालं नाही. ८ ते १० वर्षांनंतर जेव्हा मला यश मिळालं तेव्हा मी त्या यशाचा आनंद न घेता वेगवेगळ्या गोष्टींवर काम करू लागले.मी फेअरनेस प्रॉडक्ट्सच्या जाहिरातींना नकार दिला, आयटम सॉन्ग नाकारले. मोठ्या नायकाच्या चित्रपटात, मोठ्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये काम करण्यास नकार दिला. अनेक शत्रू देखील केले. मी पैशापेक्षाही जास्त शत्रू बनवले. त्यानंतर देशाबद्दल, देशाला तोडणाऱ्या शक्तीबद्दल, मग ते जिहादी असो किंवा खलिस्तानी किंवा शत्रू देशांबद्दल अधिक जागरूकता असोत मी त्यांच्या विरोधात आवाज उठवला. माझ्यावर अजूनही कितीतरी केसेस आहेत. मला अनेकदा लोक विचारतात की हे सगळं करून तुला काय मिळतं, तू असं का करतेस? हे तुमचे काम नाही. तर आज मला त्या लोकांना सांगायचं आहे, मला पद्मश्रीच्या रूपाने मिळालेला हा सन्मान अनेकांची तोंडं बंद करेल. मी मनापासून या देशाची आभारी आहे."

कंगना राणावत व्यतिरिक्त गायक अदनान सामीलाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर एकूण ६१ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर पुरस्कार सोहळ्यादरम्यान कंगनाने सिल्कची साडी परिधान केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: इंदापूरमध्ये तीव्र राजकीय संघर्ष, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी

Kolhapur Local Body Election : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील निकाल स्पष्ट; मुरगूडमध्ये मुश्रीफ गटाला धक्का, हातकणंगलेत काँग्रेसचा वरचष्मा

Solapur : स्ट्राँग रूमची चावी हरवली, शेवटी अधिकाऱ्यांनी कुलूप तोडलं; मतमोजणीला उशिरा सुरुवात

Latest Marathi News Live Update: उपचार सोडून उमेदवार थेट रुग्णवाहिकेतून मुलाखत द्यायला अजित पवारांकडे दाखल

Nagar Palika Result 2025 : उरणमध्ये अज्ञात व्यक्ती स्ट्राँग रुममध्ये घुसला, नाश्ता देण्याच्या बहाण्याने आला अन्... मतमोजणी केंद्रावर राडा

SCROLL FOR NEXT