'Kanguva' Release 38 Languages :  esakal
मनोरंजन

'Kanguva' Release 38 Languages : पाच-दहा नाही, तर तब्बल ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार सुर्याचा 'कंगुवा' चित्रपट

साऊथचा सुपरस्टार सुर्या हा त्याच्या वेगळ्या स्वॅगसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.

युगंधर ताजणे

'Kanguva' Release 38 Languages : साऊथचा सुपरस्टार सुर्या हा त्याच्या वेगळ्या स्वॅगसाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. कमल हासनच्या विक्रममध्ये त्यानं साकारलेला रोलेक्स भाई हा त्याच्या चाहत्यांच्या कौतुकाचा विषय होता. आता तो कंगुवासाठी ट्रेडिंगचा विषय आहे.

साऊथचा सिंघम म्हणूनही सुर्याकडे पाहिले जाते. त्याच्या आगामी कंगुवा या चित्रपटाची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. त्या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्याचे दुसरे कारण हा चित्रपट तब्बल ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुर्यानं त्याच्या जन्मदिनाच्या निमित्तानं कंगुवामधील लूक शेयर केला होता. तेव्हापासून या चित्रपटाची चाहते वाट पाहत आहेत.

Mahua Moitra : महुआ मोइत्रा यांच्यावरील कारवाई आणि वादांची मालिका

इ टाईम्सनं दिलेल्या एका बातमीनुसार, कंगुवाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबत निर्माते खूपच उत्सुक आहे. यापूर्वी या चित्रपटाचा एक बीजेएम सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याला प्रेक्षकांचा, नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासून या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता चाहत्यांना आहे. हा चित्रपट ३८ भाषांमधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुर्याचा या अगोदर आलेला विक्रम प्रेक्षकांना भावला होता. तसेच जय भीममध्ये त्यानं साकारलेली वकिलाची भूमिकाही गाजली होती.

याशिवाय असंही म्हटलं जात आहे की, सगळ्याच भाषांमध्ये ३ डी आणि आयमॅक्स फॉर्मटमध्ये देखील प्रदर्शित केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निर्मात्यांचे म्हणणे आहे की, कंगुवाच्या निमित्तानं विविध भाषांमधील प्रेक्षक जोडण्याचा प्रयत्न यानिमित्तानं केला जाणार आहे. अजूनही काही प्रेक्षकांपर्यत तमिळ चित्रपट पोहचलेला नाही.

केव्हा प्रदर्शित होणार?

कंगुवाचे दिग्दर्शन सिरुथाई शिवानं केले आहे. ही फिल्म आता शेवटच्या टप्प्यात असून पहिल्यांदा कंगुवा ही दहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता त्यानंतर तो ३८ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. त्याच्या प्रदर्शनाबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही २०२४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार असल्याची चर्चा आहे. मेकर्स तारीख कधी घोषित करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT