Kannada actor Chetan Kumar  Esakal
मनोरंजन

Chetan Kumar: हिंदुत्वविरोधी ट्विट करणं अभिनेत्याला भोवलं! पोलिसांनी केली अटक

सकाळ डिजिटल टीम

कन्नड अभिनेता चेतन कुमार याचे एक ट्विट सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. या ट्विटमध्ये त्याने लिहिले होते की, हिंदुत्व हे 'खोट्यांच्या आधारे उभारले गेले आहे'. या ट्विटनंतर सोशल मिडियावर एकच गोंधळ उडाला होता.

दरम्यान आज चेतन कुमार याला बेंगळुरूमधील शेषाद्रिपुरम पोलिसांनी अटक केल्यांची बातमी समोर आली आहे.

काल चेतनने ट्विट केले होते की, हिंदुत्व हे खोट्या गोष्टींवर बांधलेले आहे. या ट्विटच्या आधारे शेषाद्रिपुरम पीएस येथे तक्रारही नोंदवण्यात आली होती. बजरंग दलाचे शिवकुमार यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ही करवाई करण्यात आली आहे.

चेतन कुमारच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "हिंदुत्व हे खोट्याच्या आधारावर बांधले गेले आहे...

सावरकर: रामाने रावणाचा पराभव करून अयोध्येत परतल्यावर भारतीय राष्ट्राची सुरुवात झाली - खोटे

1992: बाबरी मशीद ही 'रामाची जन्मभूमी' आहे - खोटे

2023: उरीगौडा-नांजेगौडा हे टिपूचे 'मारेकरी' - खोटे

हिंदुत्वाचा सत्याने पराभव केला जाऊ शकतो - सत्य सर्वांसाठी समान आहे

कन्नड चित्रपट अभिनेता चेतन कुमारचं नाव याआधीही अनेक वादांमध्ये सामिल आहे. काही दिवसांपुर्वी त्याला हिजाब रो संदर्भातही अटक करण्यात आली होती. त्यावेळीही चेतन याने हिजाब प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांविरुद्धच आक्षेपार्ह ट्विट केला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.

त्यावेळीही त्याच्यावर आयपीसीच्या कलम ५०५(२) आणि ५०४ अंतर्गत एफआयआर नोंदवली आणि चेतन अहिंसा याला बेंगळुरू शहर पोलिसांनी अटक केली होती. आता पुन्हा त्याच्या या ट्विटने नवीन वादाला तोंड फोडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता १६ तासांचा प्रवास फक्त ८ तासांत! विदर्भ समुद्री मार्गाने मुंबईशी जोडला जाणार; पर्यटन आणि व्यवसायाला चालना मिळणार, वाचा संपूर्ण प्लॅन

Jalgaon Sports Complex : जळगाव जिल्हा क्रीडासंकुलाला ऑलिंपिक टच! खानदेशातला पहिला अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक साकारणार

D Mart Barcode Scam : डी मार्टच्या बारकोडमध्ये स्कॅम करायचा, कंपनीतील कर्मचाऱ्याने लावलं होतं कामाला...; पण एक चूक पडली महागात

Video: ट्रॅक्टरवर वाजलं 'चुनरी-चुनरी' गाणं.. फॉरेनरसुद्धा थिरकल्या; व्हिडीओ तुफान व्हायरल

Latest Marathi Breaking News : पंढरपूरमध्ये तीन दुकानांना मोठी आग

SCROLL FOR NEXT