Puneeth Rajkumar  esakal
मनोरंजन

पुनीत रिअल Hero; निधनानंतर डोळे दान, वडिलांच्या पावलावर पाऊल

सकाळ डिजिटल टीम

पुनीतचा अनाथाश्रम आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाचा मोठा वाटा आहे.

बंगळुरु (कर्नाटक) : कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचं काल वयाच्या 46 व्या वर्षी निधन झालं. काल (शुक्रवार) त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अभिनेता पुनीत हा अनाथाश्रमातील मुलांसाठीच काम करणारा म्हणून मर्यादित नव्हता, तर खऱ्या आयुष्यात देखील पुनीत राजकुमार एका 'राजा'सारखाच होता. हजारो विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाबरोबरच वृद्ध आणि अनाथांच्या पालनपोषणाचं काम देखील त्यानं केलंय. पुनीतनं समाजासाठी योगदान दिल्याचं कधीही उघड न करता, तो प्रामाणिक सेवा करत होता.

पुनीतचा अनाथाश्रम आणि गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोलाचा मोठा वाटा आहे. पुनीतची ही वीरता केवळ पडद्यावरच्या अभिनयापुरती मर्यादित नव्हती. तर वास्तविक जीवनात 'राजकुमार' म्हणून तो अनेक अनाथ मुलांचं संगोपन करत होता. पुनीतनं आजवर कुठेही स्वत:ला सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख दाखवली नाही. पुनीतनं 26 हून अधिक अनाथाश्रम, 25 शाळा, 19 गोशाळा, 1800 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, 16 वृद्धाश्रमचे पालनपोषण केलंय. याशिवाय जवळपास 45 शाळकरी मुलांचं जीवन घडवलंय. पुनीतच्या सामाजिक कार्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. राजकुमारनं सिनेमातून मिळणाऱ्या कमाईचा काही भाग वृद्धाश्रमाला दान केल्याचं सांगितलं जातंय.

पुनीत राजकुमारची माहिती

पुनीत राजकुमार हा कन्नड सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा सर्वात लहान मुलगा आणि प्रख्यात स्टार KFI शिवराज कुमार यांचा धाकटा भाऊ आहे. त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बेट्टाडा हूवू’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे. तसेच ‘चालिसुवा मोडागलू’ आणि ‘येराडू नक्षत्रगलू’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना कर्नाटक राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे.

पुनीत असा झाला 'सुपरस्टार'

पुनीत यांना अप्पू या नावाने ओळखलं जातं. २००२ मध्ये त्यांना ही ओळख मिळाली. ‘अभी’, ‘वीरा कन्नडिगा’, ‘अजय’, ‘अरासु’, ‘राम’, ‘हुडुगारु’ आणि ‘अनजनी पुत्र’ यांसारख्या चित्रपटात ते झळकले आहेत.‘Yuvarathnaa’ या चित्रपटात ते अखेरचे झळकले असून याच वर्षी त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Isro News : चंद्र अन् अंतराळात भारताची छाप! अंतरिक्ष स्टेशनचे स्वप्न आले जवळ; इस्रोची दोन नवीन स्पेडेक्स मोहिमा जाहीर

बिग बॉसच्या घरात तुला भाऊ मानणारे लग्नाला का नाही आले? सुरज चव्हाणने मारली पलटी; म्हणतो- आता ते लोक...

World Tuberculosis Day 2026: पाठदुखी फक्त पोस्चरमुळे नाही; कधी स्पायनल टीबीही असू शकतो कारण ! 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नका

Who is Ashok Kharat : कॅप्टन खरातकडून पंचवीस वर्षांपासून अंधश्रद्धेला खतपाणी! 'सकाळ'ने वृत्तमालिकेद्वारे भोंदूगिरीवर टाकला होता प्रकाशझोत

IPL 2026 New Rule : १५ नवीन नियम... BCCIने खेळाडू, त्यांचे कुटुंबिय अन् फ्रँचायझीची डोकेदुखी वाढवली; चुका केल्यास कठोर कारवाई

SCROLL FOR NEXT