Kantara fame actor kishore twitter account suspend Google
मनोरंजन

'Kantara' सिनेमातील अभिनेत्याचं ट्वीटर अकाउंट सस्पेंड, काय आहे कारण?

किशोर अनेकदा वादग्रस्त वक्तव्य ट्वीटरवर कराताना दिसला आहे. त्याचं ट्वीटर अकाउंट बंद झाल्यानं चाहते मात्र भडकले आहेत अन् एलन मस्ककडे मागणी करत आहेत.

प्रणाली मोरे

Kantara fame actor kishore twitter account suspend: ऋषभ शेट्टीच्या कन्नड ब्लॉकबस्टर चित्रपटात 'कांतारा' मध्ये फॉरेस्ट पोलिसाची भूमिका करणारा दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता किशोर याचे ट्विटर अकाउंट अलीकडेच निलंबित करण्यात आले आहे. पण यानंतर मात्र सोशल मीडियावर मोठा राडा पहायला मिळत आहे. किशोरच्या चाहत्यांनी थेट यासाठी एलन मस्ककडे मागणी करत आवाजा उठवला आहे.

2022 मध्ये आलेला 'कांतारा' आणि 'पोन्नियिन सेल्वन: भाग '1 मधील अभिनयासाठी लोकांची मने जिंकणारा किशोर पुन्हा चर्चेत आला आहे. नुकतेच त्याचे ट्विटर अकाउंट नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सस्पेंड करण्यात आले होते. तथापि, नेमके कोणत्या कारणांमुळे ट्विटरने त्याचे अकाउंट निलंबित केले हे स्पष्ट झालेले नाही. पण त्यांच्या चाहत्यांनी चक्क एलन मस्क यांना ट्विट केले आहे आणि किशोरच्या अकाउंटचे निलंबन मागे घ्या अशी मागणी केली आहे.

किशोर अभिनेता तर आहेच पण तो एक सामाजिक कार्यकर्ता देखील आहे. आपले विचार स्पष्टपणे मांडण्यासाठी ओळखला जातो. काहीवेळा किशोर असे काही ट्विट करतो ज्याने तो वादाच्या भोवऱ्यात सापडतो. या आधीपण किशोरने काश्मिरी पंडितांच्या हत्येची मुस्लिमांच्या हत्येशी बरोबरी करण्या विषयीच्या टिप्पणीबद्दल सहकारी अभिनेत्री साई पल्लवीला पाठिंबा दिला होता. तेव्हा किशोरला सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या संतापाचा सामना करावा लागला होता. अद्याप किशोरनं त्याचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड केल्याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

हेही वाचा: ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

किशोर हा कन्नड, तामिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमधील सर्वात जास्त मागणी असलेला अभिनेता आहे. कन्नड चित्रपटात वीरप्पनची भूमिका साकारल्यानंतर तो अधिक प्रसिद्ध झाला. किशोर हा नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो. शेतकर्‍यांना पाठिंबा देत त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकताना त्याने आपले मत अनेकदा स्पष्टपणे मांडले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेतक-यांच्या बाबतीत आपल्या राज्यात चालू असलेल्या समस्येवर तो नेहमीच चर्चा करतो. आता नेमक्या कोणत्या किशोरच्या ट्वीटमुळे ट्वीटरनं त्याचे अकाउंट सस्पेंड केले याचा पत्ता लागत नसल्यानं त्याचे चाहते मात्र भलतेच हैराण आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

AUS vs IND: तीन स्पिनर्स, एक वेगवान गोलंदाज... पहिल्या T20I साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update: महापालिकेतर्फे मेट्रो प्रवाशांसाठी बाणेर-बालेवाडीत चार पार्किंग

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

BSNL Vacancy 2025 : फ्रेशर्सना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 50 हजारांपर्यंत बेसिक सॅलरी

SCROLL FOR NEXT