kapil sharma show 
मनोरंजन

'कपिल शर्मा शो'चा नवीन प्रोमो झाला आऊट, पाहुन तुम्हीही व्हाल लोटपोट

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- कॉमेडी किंग कपिल शर्माच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. त्याच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपणार आहे कारण कपिल त्यांच्यासाठी घेऊन आलाय एक सरप्राईज. कपिल शर्मा शोचं शूटींग सुरु झाल्याची माहिती याआधी आम्ही तुम्हाला दिलीच आहे मात्र आता लवकरंच या शोचे नवीन एपिसोड तुम्हाला पाहता येणार आहेत. 

कॉमेडियन कपिल शर्माने स्वतः त्याच्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. कपिलने या बातमीसोबत कपिल शर्मा शोचा नवीन प्रोमो देखील शेअर केला आहे. हा मजेशीर प्रोमो पाहून तुम्हीही देखील लोटपोट व्हाल.हा प्रोमो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'तो आनंद आणि ते जोक्स पुन्हा येत आहेत. कारण आम्ही करत आहोत रिस्टार्च सेफली. लवकरंच कपिल शर्मा शोचे नवीन एपिसोड घेऊन आम्ही तुमच्यासमोर येत आहोत.' 

या प्रोमोमध्ये कपिल स्टेजवर झाडू मारताना दिसतोय तर त्याचे इतर सहकलाकार खूप मस्ती करताना दिसतायेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की चाहत्यांसोबतच या शोचे कलाकारही हा शो सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या छोट्याशा प्रोमोमध्ये सगळ्यांची मस्ती पाहण्यासारखी आहे. कृष्णा तर भारती सिंहची टर उडवताना दिसतोय. 

इथे पाहा व्हिडिओ-

'कपिल शर्मा शो'ची शूटींग काही दिवसांपूर्वीच सुरु झाली होती. कपिल शर्मा, सुमोन चक्रवर्ती, भारती सिंह सेटवर पोहोचल्याचे फोटो कपिलने शेअर केले होते. कपिलने सेटवरची सगळ्यांची एंट्री त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली होती. शोचा प्रोमो तर आला मात्र आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती लॉकडाऊननंतरच्या या पहिल्या एपिसोडमध्ये कोणता कलाकार पाहुणा म्हणून येईल याची. लॉकडाऊनमध्ये सगळ्यांसाठी देव माणूस ठरलेला अभिनेता सोनू सूद या शोचा पहिला पाहुणा असल्याच्या खूप चर्चा आहेत.   

kapil sharma show new promo all comedians cleaning floors and doing masti  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT