The Kapil Sharma Show Promo The Kapil Sharma Show Promo
मनोरंजन

The Kapil Sharma Show Promo : अर्चना म्हणाली, बायको आठवत नाही अन्...

शोमध्ये कोण आहे हे प्रोमोद्वारे निश्चित झाले आहे

सकाळ डिजिटल टीम

The Kapil Sharma Show Promo ‘द कपिल शर्मा’ शोचा नवा सीझन येत आहे. शोचा नवा प्रोमो (Promo) रिलीज झाला आहे. यावेळी शोमध्ये कोण आहे हे प्रोमोद्वारे निश्चित झाले आहे. सोबतच जुना कॉमेडियनही नव्या अवतारात दिसला आहे. व्हिडिओमध्ये कपिलला (Kapil Sharma) हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचे दिसते. शुद्धीवर येताच सर्वजण त्याच्या बाजूला उभे राहतात. तो सासऱ्याला ओळखतो. हे पात्र इश्तियाक खान साकारत आहे.

गुडियाच्या भूमिकेत किकू शारदा आणि चंदूच्या भूमिकेत चंदन प्रभाकर दिसत आहे. मात्र, सुमोनाला पाहून कपिल म्हणतो, ही बहीण कोण आहे. यानंतर सर्वजण म्हणतात ही तुमची पत्नी आहे. मात्र, कपिल हे मान्य करीत नाही. त्यानंतरच एक एंट्री होते. ही एंट्री अभिनेत्री सृष्टी रोडे करते. शो मध्ये तिचे नाव गझल आहे.

गझलला पाहून कपिल (Kapil Sharma) तिच्या स्कूटीचा नंबर बोलू लागतो. तेवढ्यात अर्चना (Archana Puran Singh) तिथे येते आणि म्हणते की, बायको आठवत नाही आणि तिच्या स्कूटीचा नंबर लक्षात आहे.

प्रोमो (Promo) पाहिल्यानंतर चाहत्यांना कृष्णा अभिषेकची खूप आठवण आली. प्रत्येकजण म्हणत आहे की कृष्ण असायला हवा होता. त्याला परत बोलवा. त्याचवेळी काही चाहत्यांनी कपिल शर्माला सुनील ग्रोव्हरला परत आणण्यास सांगितले.

नुकतेच कृष्णाने पुष्टी केली की तो आता या शोचा भाग नाही. आतापर्यंत या शोमध्ये सपना, जॅकी दादा, धर्मेंद्र आणि जितेंद्र यांनी भूमिका साकारल्या आहेत. कृष्णाने कपिल शर्मा शोमध्ये काम न करण्याचे कारण एका मुलाखतीत सांगितले. करारात अडचण असल्याने काम करीत नसल्याचे तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT