the kapil sharma show Ranjeet father angry for tearing Rakhees clothes in his debut film baap ka naak katwa diya hai 
मनोरंजन

'राखीचे कपडे फाडले,वडिलांनी घराबाहेर काढले' 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - खलनायक म्हणून ज्या अभिनेत्यांचे नाव अद्यापही प्रेक्षकांच्या मनात आहे त्यात कलाकार रणजीत यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. आपल्या अभिनयानं रसिकांच्या ह्रद्यात स्थान मिळवणा-या रणजित यांचा बॉलीवूडमधील प्रवास काही सोपा नव्हता. 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणा-या रणजित यांनी कपिलच्या कार्यक्रमात आपल्या चित्रपट प्रवासाविषयी काही आठवणींना उजाळा दिला.

रणजित बरोबर कपिलच्या शो मध्ये गुलशन ग्रोव्हरही सहभागी झाले होते. कपिलनं ज्यावेळी रणजित यांना त्यांच्या खलनायक भूमिकेविषयी विचारले असता ते म्हणाले की, माझ्या वडिलांना मी करत असलेल्या खलनायकाच्या भूमिका फारशा कधी आवडल्या नाहीत. ते मला त्यावरुन नेहमी बोलत असायचे. याप्रसंगी त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. ते म्हणाले, माझे कपडे त्यांनी घरातून बाहेर फेकून दिले होते. त्यांचे म्हणणे असे होते की, मी एका चित्रपटात राखी यांचे कपडे फाडले होते. तो माझा पहिला चित्रपट होता. त्यात अशाप्रकारचे काम मला करावे लागल्यानं त्यांचा माझ्यावर राग होता. गोपाळ बेदी असे पूर्ण नाव असणारे रणजित बॉलीवूडमधील प्रसिध्द कलाकार आहेत. 74 वर्षांच्या रणजित यांनी वेगवेगळ्य़ा प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात प्रामुख्यानं खलनायकाची भूमिका त्यांनी केली आहे.

रणजित यांच्या पहिला चित्रपटात शशी कपूर, राखी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्या चित्रपटातील भूमिकेचे प्रेक्षकांनी स्वागत केले.मात्र ती भूमिका त्यांच्या घरच्यांना फारशी पसंत पडली नाही. खासकरुन वडिलांनी नाराजी व्यक्त केली होती. रणजित चित्रपटात गेल्यानंतर अशाप्रकारच्या भूमिका करतील अशी अपेक्षा कुणाला नव्हती. त्यामुळे वडिलांचा त्यांना ओरडा खावा लागला होता. त्यांनी सांगितले की, जेव्हा माझा पहिला चित्रपट शर्मिली प्रदर्शित झाला होता तेव्हा मला घराबाहेर काढले होते. याचे कारण मी त्या चित्रपटात राखीचे कपडे फाडले होते. तिचे केस ओढले होते. म्हणून घरच्यांचा माझ्यावर राग होता. 

माझ्या पहिल्या चित्रपटावर वडिलांची प्रतिक्रिया फार संतप्त होती. ते म्हणाले होते, हे काय काम आहे, एखाद्या मेजर किंवा पोलीस अधिका-याची नाहीतर एअर फोर्स अधिका-याची भूमिका केली असतीस चालले असते तु जे काम केले आहे त्यामुळे माझे नाक कापले गेले आहे. तु कोणत्या तोंडानं अमृतसरला जाशील, अशाप्रकारची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. आता रणजित एका विनोदी मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत ज्याचे नाव बिचारे असे आहे. 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : आखाती देशांमधील युद्धाची झळ थेट बळीराजाच्या खिशाला

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT