Kapil Sharma Sunil Grover Reunion tv entertainment  esakal
मनोरंजन

Kapil Sharma Sunil Grover Reunion: कपिल-सुनीलमधला वाद अखेर मिटला, सहा वर्षांनंतर पुन्हा एकत्र

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदवीर म्हणून ओळखल्या गेलेल्या कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांची गोष्टच वेगळी आहे.

युगंधर ताजणे

Kapil Sharma Sunil Grover Reunion tv entertainment : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध विनोदवीर म्हणून ओळखल्या गेलेल्या कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांची गोष्टच वेगळी आहे. दोघांचा मनोरंजन विश्वातील संघर्ष मोठा आहे. त्यांनी स्वताची वेगळी ओळख तयार करण्याकरिता प्रचंड मेहनतही घेतली आहे. अशातच त्यांच्या मैत्रीला एका घटनेमुळे गालबोट लागले होते.

सोशल मीडियावर सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्या व्हायरल झालेल्या त्या फोटोनं वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. अर्चना पुरन सिंग यांनी त्यांच्या इंस्टावरुन व्हायरल केलेल्या त्या फोटोंवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही चर्चेत आहेत. अखेर त्या दोन्ही कलाकारांमधील भांडण मिटले. ते आता नेटफ्लिक्सच्या एका विनोदी मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्या एका शो चा प्रोमो समोर आला होता. त्यात ते एकत्र काम करणार असल्याचे सांगण्यात आले होते. कपिलनं देखील त्याच्या इंस्टावरुन व्हायरल केलेल्या एका पोस्टमधून याविषयी माहिती दिली होती. नेटफ्लिक्सवर हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याचे त्यानं सांगितले होते. आता अर्चनानं शेयर केलेल्या फोटोनं चर्चेला उधाण आले आहे.

सुनील आणि कपिल यांनी कॉमेडी शो च्या माध्यमातून मनोरंजन विश्वात इंट्री झाली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांतून आपली छाप उमटविल्याचे दिसून आले आहे. सुनीलनं सनफ्लॉवर आणि तांडव नावाच्या मालिकेतून प्रेक्षकांना जिंकून घेतले होते. एवढेच नाहीतर त्यानं शाहरुख खानच्या जवानमध्ये देखील एका पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

अर्चनानं तो फोटो शेयर करताना म्हटलं आहे की, नेटफ्लिक्ससोबत एक शानदार पार्टी.... यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर दोन्ही सेलिब्रेटींचे कौतुक केले आहे. एकानं म्हटलं आहे की, तुम्ही दोघे एकत्र येणार आहात हे ऐकून आनंद वाटला. तुम्हा दोघांनाही खूप साऱ्या शुभेच्छा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT