Kapil Sharma, Narendra Modi
Kapil Sharma, Narendra Modi Google
मनोरंजन

'नरेंद्र मोदींचे कौतूक करायला किती पैसे घेतलेस?' कपिल ट्वीटरवर ट्रोल

प्रणाली मोरे

कपिल शर्मा(Kapil Sharma) हा नेहमीच आपल्या विनोदी शैलीनं लोकांना हसवायचं काम करीत असतो. पण या व्यतिरिक्त देखील अनेकदा तो सोशल मीडियावर वेगवेगळ्या,अगदी गंभीर विषयावरही व्यक्त होताना दिसतो. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तर तो नेहमी आपली मतं मांडताना दिसतो. यावरनं अनेकदा तो ट्रोलही होतो. त्याच्या ट्वीटवरनं रंगलेले वाद काही नवीन नाहीत. त्यानं थेट मोदींवरही ट्वीटच्या माध्यमातनं मागे भाष्य केलं होतं. ज्यामुळे त्याला काही दिवस लपून राहायची वेळ आली होती. पण आता त्यानं असंच मोदींची(Narendra Modi) प्रशंसा करणारं एक ट्वीट केलं आहे,जे व्हायरल झालं आहे. पण यावरन नेटकऱ्यांनी मात्र त्याला ट्रोल केलं आहे. काय म्हटलंय ट्वीटमध्ये कपिलने नेमकं?

कपिलचं हे ट्वीट हिंदी भाषेत आहे. त्याचं मूळ ट्वीट आम्ही बातमीत जोडत आहोत. तर कपिलनं लिहिलंय,''पंतप्रधान नरेंद्र मोदीजी,भारताच्या अमूल्य खजिन्याला थेट ऑस्ट्रेलियातून पुन्हा आपल्या देशात आणण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. २९ पुरातन वस्तू आपण ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणल्या आहेत. या वस्तु ६ वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत-शिव आणि त्यांचे शिष्य,शक्तीची पूजा,भगवान विष्णू आणि त्यांची रुपं,जैन परंपरा,चित्र आणि सजावटीच्या वस्तू'' या ट्वीट सोबत नरेंद्र मोदी त्या अमूल्य खजिन्यासमोर उभे राहून त्यांना न्याहाळत असल्याचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

या कपिलच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या खूप संमिश्र प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. काही लोकांनी कपिलच्या पोस्टचं कौतूक केलं आहे. तर काहींनी चक्क म्हटलंय,'पेड ट्वीट'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे,'एकदा भेट तू नक्की. हा तोच आहे ज्यानं 'द काश्मिर फाईल्स' सिनेमाचं प्रमोशन करायला नकार दिला होता,आणि आता उगाचच सौजन्याचं नाटक करतोय.सगळं लक्षात ठेवणार आम्ही,पहातो एकदा तुला'.

'द काश्मिर फाईल्स'(The Kashmir files) सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी कपिलच्या शो वर आरोप केला होता की,सिनेमात मोठी स्टार कास्ट नसल्यामुळे आम्हाला प्रमोशनला बोलावलं गेलं नाही. पण कपिलने हे आरोप खोटे असल्याचं म्हटलं होतं. यासंदर्भात अनुपम खेर यांनी चुप्पी तोडत कबूल केलं होतं की,''कपिलने नाही तर त्यांनी स्वतः सिनेमाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शो मध्ये जाण्यास नकार दिला होता. कारण सिनेमाचा विषय गंभीर तर कपिलचा शो विनोदी धाटणीचा''. याच अनुपम खेर यांच्या मुलाखतीतील क्लीपला शेअर करत कपिलनं अनुपम खेर यांचे धन्यवाद मानले होते. पण त्यावर अनुपम खेर यांनी म्हटलं होतं,''कपिलने अर्ध सत्य जाणून घेतलं,त्यानं पूर्ण व्हिडीओ क्लीप पाहून ती संबंध शेअर करायला हवी होती''. या सगळ्या एकंदरीत प्रकरणानंतर कपिलवर नेटकरी भलतेच वैतागले आणि मग त्याचाच परिणाम झाला अन् कपिल मोदीं संदर्भात केलेल्या चांगल्या ट्वीटवरनंही ट्रोल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT