Kapil Sharma's show in New York postponed due to some conflict.  Google
मनोरंजन

कपिल विरोधात परदेशातही कोर्टात केस, म्हणूनच न्यूयॉर्कमधील शो अडचणीत?

कपिल शर्मा शो ची टीम सध्या य़ूएस आणि कॅनडाच्या टूरवर आहे.

प्रणाली मोरे

स्टॅंडअप कॉमोडियन कपिल शर्मा(Kapil Sharma) आणि त्याची पूर्ण टीम यूएस आणि कॅनडाच्या टूरवर आहे. साता समु्द्रा पल्याड कपिल त्याच्या चाहत्यांचं मनसोक्त मनोरंजन करत आहे. अर्थात एवढं सगळं चांगलं कानावर पडत असलं तरी नेहमीप्रमाणे कपिलशी वाद देखील इथे जोडला गेलाय. कपिलचा कॉन्सर्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.(Kapil Sharma's show in New York postponed due to some conflict).

कपिलचा ९ जुलै रोजी न्यूयॉर्कला होणारा शो पोस्टपोन झाला आहे. शो च्या तिथल्या लोकल प्रमोशन संदर्भातल्या गोष्टी पाहणाऱ्या सॅम सिंगने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून शो Postpone झाल्याची माहिती दिली आहे. आपल्या या पोस्टमध्ये सॅमने पोस्टपोन झालेल्या शो ची नवी तारीख मात्र सांगितलेली नाही. पोस्टमध्ये लिहिले आहे-''द कपिल शर्मा शो, जो ९ जुलै रोजी Nassau Colisemमध्ये आणि २३ जुलै रोजी Cue Insurance Arena मध्ये रंगणार होता. पण कार्यक्रमाच्या शेड्युलिंगवरनं वाद सुरु झाला आणि कार्यक्रम पोस्टपोन झाला. कपिलच्या या शो साठी ज्यांनी तिकीटं अॅडव्हान्समध्ये खरेदी केली आहेत,ती पुढच्या तारखेपर्यंत वॅलिड असणार आहेत. जर कुणाला रीफंड हवा असेल तर कृपया जिथून तिकीटं खरेदी केली होती तिथे जाऊन संपर्क साधावा''.

Kapil Sharma's show in New York postponed due to some conflict.

शोला रिशेड्युल करण्याचं कारण विचारलं गेलं तेव्हा सॅम सिंगने एका इंग्रजी न्यूज पोर्टलला प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे,''हा आमचा खाजगी विषय आहे की आम्ही नव्या तारखेवर आता शो करीत आहोत. याचा कोणत्याही वादाशी, फेक केसशी संबंध नाही. बोललं जात आहे की, Sai USA Inc ने कपिल शर्माच्या विरोधात २०१५ च्या नॉर्थ अमेरिका टूरच्या कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन केल्याच्या आरोपात केस दाखल केली होती''.

अमेरिकेचे प्रसिद्ध आयोजक अमित जेटली यांचा आरोप आहे की, कपिलने २०१५ मध्ये नॉर्थ अमेरिका मध्ये ६ शो करण्याचं मान्य केलं होतं,यासाठी कपिलला पेमेंट देखील केलं होतं. पण कपिलनं ६ पैकी एका शहरात परफॉर्म नव्हतं केलं. कपिलनं नुकसान भरपाई करेन असं आश्वासनही दिलं होतं. पण त्याने तसं केलं नाही. ही केस न्यूयॉर्क कोर्टात सुरू आहे. या केससंदर्भात अद्याप कपिल शर्मानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. हे सगळं सुरू असलं तरी कपिल शर्मा सध्या सोशल मीडियावर आपल्या टूरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT