Bollywood filmmaker Karan Johar confesses 
मनोरंजन

Karan Johar Bollywood : 'दोन पैसे घ्या पण माझ्या चित्रपटाला चांगलं म्हणा'! करणनचं केला मोठा खुलासा

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरनं आता जी गोष्ट सांगितली आहे त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

Bollywood filmmaker Karan Johar confesses : बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहरनं आता जी गोष्ट सांगितली आहे त्यामुळे तो चर्चेत आला आहे. ती गोष्ट करणनं कबूल केल्यानं चाहत्यांना धक्का बसला आहे. करणच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. त्याची होणारी चर्चाही नेहमीच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते.

करण जोहरच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद आणि त्या चित्रपटांची होणारी कमाईही मोठी असते. बॉक्स ऑफिसवर त्याच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानीनं तीनशे कोटींहून अधिक बिझनेस केला होता. रणवीर सिंग, आलिया भट्ट यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात शबाना आझमी, धर्मेंद्र, जया बच्चन यांच्या भूमिका होत्या.

करण हा त्याच्या कॉफी विथ करणमुळे देखील चर्चेत आल्याचे दिसून येते. त्याच्या या शो मध्ये बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी कॉफी विथ करणमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी शर्मिला यांनी सैफच्या गतकाळातील आठवणी सांगून सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. त्यात आता करणनं त्याच्या चित्रपटांविषयी केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे.

करणनं एका मुलाखतीमध्ये त्याच्या चित्रपटांना मिळणारं रेटिंग याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. तो म्हणतो, मी माझ्या चित्रपटांना अनेकांनी चांगलं म्हणावं म्हणून मी खूप सारे पैसे खर्च करतो. असे करणचे म्हणणे आहे. करण त्याच्या चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी पैसे देतो. असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. यावर त्यानं ती गोष्ट मान्य केली आहे. होय मी असे करतो मात्र एखादा चित्रपट हिट व्हावा यासाठी या गोष्टी कराव्या लागतात.

तुम्हाला माहिती नसेल पण मला बऱ्याचदा माझे चित्रपट चर्चेत यावेत यासाठी पैसे खर्च करावे लागतात. गलाटा प्लससोबत बातचीत करताना करणनं म्हटलं आहे की, माझ्या चित्रपटांविषयी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून मला पैसे खर्च करावे लागतात. बऱ्याचदा आम्हीच आमच्या चित्रपटाचा पीआर करण्यासाठी आमच्या लोकांना सांगतो तेच व्हिडिओ करुन तुमचे लक्ष वेधून घेताना दिसतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT