Dhadak 2 Esakal
मनोरंजन

Dhadak 2: सैराटच्या रिमेकचा सिक्वेल येणार? करण जोहर म्हणतोय,..

Vaishali Patil

Dhadak 2: मराठी मनोरंजन विश्वात नागराज मंजुळेच्या सैराटने अनेक नवीन रेकॉर्ड बनवले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यानंतर बॉलिवूडनेही या चित्रपटाचा रिमेक तयार केला. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध निर्माता करण जोहरने काही वर्षांपूर्वी सैराटचा रिमेक तयार केला ज्याच नाव 'धडक' होतं.

या चित्रपटातुन जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर या स्टार किड्सला करणने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. या चित्रपटात या दोन्ही स्टार्सची शानदार एन्ट्री झाली, प्रेक्षकांनीही याचित्रपटाला समिश्र प्रतिसाद दिला. तर काहींनी दोघही स्टार किड असल्यामुळे त्याच्यावर टिकाही केली होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप झाला.

Dhadak Movie

मात्र आता करण जोहरने धडक 2 ची तयारी सुरु केली असल्याची चर्चा रंगली होती. करण जोहरच्या बॅनरखाली बनणाऱ्या धडक 2 चे दिग्दर्शन शाझिया इक्बाल करणार आहे.तर या चित्रपटातुन जान्हवी आणि ईशानचा पत्ता कट झाला असून त्यांच्याजागी सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांना साइन केले आहे अशाही चर्चा रंगल्या. त्यामुळे या चित्रपटाबद्दल अनेकांना उत्सूकता लागली होती.

मात्र याप्रकरणाबद्दल अधिकृत घोषणा झाली नसल्याने या अफवा असल्याचं बोललं जात होतं. त्यातच करण जोहरने या चित्रपटाबद्दल स्पष्ट केलं आहे. करणने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलयं की तो धडक 2 या नावाचा चित्रपट तयार करत नाही आहे. त्याने या सर्व बातम्या वाचल्या आहेत. त्यामुळेच त्याने हे स्पष्ट केलं की धर्मा प्रोडक्शन अशा नावाचा कोणताही चित्रपट तयार करत नाही आहे.

तब्बल 7 वर्षांनंतर करण जोहरने पुन्हा एकदा दिग्दर्शनात वापसी करणार आहे. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातून तो या वर्षी दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. यात रणवीर सिंग, आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT