Karan Johar Interview PM Narendra And Shri Devi  esakal
मनोरंजन

Karan Johar Modi Biopic : 'श्रीदेवी अन् पीएम मोदी यांच्यावर बायोपिक केला तर कुणाला संधी देशील', करणनं कुणाचं घेतलं नाव?

बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वक्तव्यांसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Karan Johar Interview PM Narendra And Shri Devi : बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांसाठी आणि वक्तव्यांसाठी चर्चेत असणारा सेलिब्रेटी आहे. गेल्या वर्षी त्याच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्या चित्रपटानं दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.

करणचा कॉफी विथ करण नावाचा शो टीव्ही मनोरंजन विश्वात लोकप्रिय आहे. त्याचा आता ८ वा सीझन सुरु आहे.त्यावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येते. त्यामध्ये त्यानं बॉलीवूडमधील अनेक मान्यवरांशी संवाद साधला आहे. त्यावरुन तो बऱ्याचदा वादातही अडकला आहे. अशाच एका मुलाखतीमध्ये करणला एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्याचं त्यानं दिलेलं उत्तर चर्चेत आलं आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावरील बायोपिकची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. द वीक नं करणची घेतलेली ती मुलाखत आणि त्यात त्याला जर तुला मोदीजींवर बायोपिक करायचा झाल्यास तू कोणत्या अभिनेत्याला त्यात घेशील, असा प्रश्न करणला विचारण्यात आला होता. त्यावर त्यानं दिलेलं उत्तर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे.

करणनं दोन्ही प्रश्नांची उत्तरं विचारपूर्वक दिली. श्रीदेवीच्या बायोपिकमध्ये तू कोणत्या अभिनेत्रीला पाहतोस, त्यावर तो म्हणाला, मला श्रीदेवीच्या बायोपिकमध्ये तिची मुलगी जान्हवी कपूरला पाहायला आवडेल. त्याचे कारण म्हणजे, तिचं दिसणं, तिची स्टाईल आणि आता चाहत्यांमध्ये जान्हवीची असणारी लोकप्रियता. त्यानंतर त्यानं मोदीजींच्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्याला कास्ट करायला आवडेल, यावर उत्तर दिलं.

करण म्हणाला, मला अमिताभ बच्चन यांचे नाव नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकसाठी योग्य वाटते. तर नीता अंबानी यांच्या बायोपिकमध्ये मी ऐश्वर्याला संधी देईल. या बरोबरच त्यानं बॉलीवूडमधील सिद्धार्थ मल्होत्रा, टायगर श्रॉफ सारख्या कलाकारांचे कौतुकही केल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT