Karan Johar New Movie Sarzameen Announced  esakal
मनोरंजन

Karan Johar New Movie : तब्बल बारा वर्षानंतर करणच्या चित्रपटात दिसणार काजोल, 'सरजमी' चित्रपटाची घोषणा!

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच त्याच्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Karan Johar New Movie Sarzameen Announced : बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर हा नेहमीच त्याच्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टसाठी ओळखला जाणारा सेलिब्रेटी आहे. गेल्या वर्षी करणचा रॉकी और रानी की प्रेम कहानी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. या सगळ्यात करणची एक पोस्ट व्हायरल झाली आहे.

करणच्या त्या पोस्टमध्ये त्यानं त्याच्या नव्या चित्रपटाचे संकेत दिले आहे. करणचा या वर्षातला तो पहिलाच चित्रपट असणार असल्याचे बोलले जात आहे. करणनं एक पोस्ट शेयर केली आहे त्यामध्ये त्यानं त्याच्या नव्या चित्रपटाविषयी सांगून चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. मात्र ती पोस्ट शेयर करताना त्यानं ही माझ्या चित्रपटाची अनाउसमेंट नाही असेही म्हटले आहे.

या सगळ्यात करणच्या हजारो चाहत्यांनी मात्र त्यानं त्याच्या नव्या चित्रपटाचीच घोषणा केली आहे असा अंदाज बांधला आहे. करणनं म्हटलं आहे की, ही माझी काही नव्या चित्रपटाची घोषणा नाही. पण करणनं एका कोड्याप्रमाणे चाहत्यांना ती माहिती शेयर केली आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी त्यानं नव्या फिल्मची घोषणा केल्याचे म्हटले आहे.

करणला त्याच्या चित्रपटाचे मार्केटिंग कसे करायचे हे चांगलेच माहिती आहे. करणचा नवा चित्रपट यायचा झाल्यास त्याचे पीआर, आणि प्रमोशन याबाबत करणचा हात धरणारा कुणी नाही. असे नेहमीच बोलले जाते. अशात त्याच्या नव्या चित्रपटाच्या घोषणेनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे काही माझ्या चित्रपटाची अधिकृत घोषणा नाही पण ती असूही शकते. हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुमची साथ असेल.

गेल्या वर्षभरापासून आमच्या चित्रपटाची शुटींग सुरु आहे. त्याबाबत कुणालाही काहीही माहिती नव्हते. खरं तर चित्रपटाच्या क्रु ला देखील या विषयी काहीही माहिती नाही. एवढी गोपनीयता आपण ठेवली आहे. हा निर्णय नव्या डेब्यू करणाऱ्या दिग्दर्शकानं घेतला आहे.

करणची पोस्ट वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात अनेकांनी त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव सरजमी असून त्यामध्ये सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान, साऊथचा अॅक्टर पृथ्वीराज सुकुमारन आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलही दिसणार आहे. तब्बल बारा वर्षानंतर काजोल ही करण जोहरच्या चित्रपटात दिसणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच प्रख्यात अभिनेते बोमन इराणी यांचा मुलगा कोयाज इराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SLC XI Warm up: टीम इंडियाने सहज जिंकला सराव सामना! आता सुरू होणार खरी परीक्षा, पाहा कसोटी मालिकेचे वेळापत्रक

Buldhana Accident: खदाणीच्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्पाजवळील घटना

फोटो काढायला आली अन् Kiss करून गेली! चाहतीचं भयंकर कृत्य पाहून घाबरली अभिनेत्री, Viral Video

Bhokardan Accident: भोकरदन-वालसावंगी मार्गावरील धोकादायक विहिरी ठरताहेत मृत्यूचा सापळा; कार विहिरीत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

Ambad Accident: खंडोबाची वारी मागण्यासाठी आले अन् काळाचा घाला; अंबडमध्ये टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT