बॉलिवूडमध्ये नेहमीच राजकारण खेळलं जात असं बोललं जात. अनेक कलाकारांनीही फक्त नेपो किड यांनाच वाव दिला जातो आणि त्यामुळे बाकी कलाकरांना चित्रपटांमध्ये काम दिलं जात नाही असं बोलल जात.
त्यातच अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिने देखील यावर भाष्य केलं आणि एकच चर्चा सुरु झाली. यात निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर यांचे नाव नेहमीच समोर येते. कंगणा राणौत देखील त्याच्यावर टिका करत असते.
त्याचबरोबर अनेक स्टार्सने खुलासा केला आहे की, करण जोहरने अनेक लोकांचे करिअर उद्ध्वस्त केले आहे. आता खुद्द करणनेच सांगितले आहे की त्याने बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच करिअर खराब करण्याचा प्रयत्न त्याने केला.
त्याला अनुष्का शर्माचे करिअर बरबाद करायचे होते, असा खुलासा खुद्द करण जोहरने केला होता. त्याने एकदा सोहळ्यात हे कबूल केले की त्याने आदित्य चोप्राच्या रब ने बना दी जोडीसाठी अनुष्काला साइन करण्यास नकार दिला होता. त्याला सोनम कपूरला या चित्रपटात कास्ट करायचं होतं, अशी करण जोहरची इच्छा असल्याच्या बातम्या आल्या होत्या.
2016 मध्ये 18 व्या MAMI मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण जोहर राजीव मसंद आणि अनुपमा चोप्रा यांच्यासोबत स्टेजवर संवाद साधत होते. यादरम्यान करण त्याच्या ए दिल है मुश्किल या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. यावेळी मंचावर अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या राय देखील उपस्थित होत्या. अनुष्काबद्दल बोलताना करण म्हणाला होता की, मला अनुष्काचे करिअर पूर्णपणे संपवायचे होते.
करण पुढे म्हणाला, 'जेव्हा आदित्यने मला या चित्रपटाबद्दल सांगितले, तेव्हा मी त्याला म्हणालो, नाही, नाही... तू वेडा आहेस का... तू तिला साइन करत आहेस का... तू वेडा झाला आहेस...अनुष्का शर्माला साइन करण्याची गरज नाही.' कारण त्यावेळी आणखी एक अभिनेत्री होती, जिला आदित्यने साइन करावे असे मला वाटत होते.
करण पुढे म्हणाला, "पण जेव्हा 'मी बँड बाजा बारात' पाहिला तेव्हा मी त्याला कॉल केला आणि मला वाटले की मी माफी मागितली पाहिजे आणि त्याचे कौतुक करावे. कारण मला खूप लाज वाटली.
अनुष्का शर्माने शाहरुख खानसोबत 2008 मध्ये रब ने बना दी जोडी या चित्रपटात पदार्पण केले. आदित्य चोप्राने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आता अनुष्का शर्मा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनुष्का केवळ एक सशक्त अभिनेत्रीच नाही तर ती चित्रपट आणि वेब सीरिजची निर्मितीही करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.