yash roohi
yash roohi 
मनोरंजन

रुही आणि यशसोबत करण जोहरने खेळलेला 'हा' रॅपिड फायर राऊंड पाहाच..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- करण जोहरने आत्तापर्यंत त्याच्या शोमधून अनेक सेलिब्रिटींनी त-हेत-हेचे प्रश्न विचारले आहेत. त्याचा कॉफी  विथ करण हा शो तर अशाच काही गॉसिप प्रश्नांमुळे चर्चेत राहिलाय. मात्र सध्या लॉकडाऊन सुरु आहे. आणि म्हणूनंच करणने हा शो घरातंच करायचा असं ठरवलेलं दिसतंय. होय. करण कॉफी विथ करण या शो मध्ये जसा रॅपिड फायर राऊंड खेळतो तसाच गेम त्याने त्याच्या मुलांसोबत खेळला आहे. आता तुम्हाला तर करणच्या मुलांचे याआधीचे व्हिडिओ पाहून कळालंच असेल की हे दोघंही करणच्या प्रश्नांची कशी अतरंगी उत्तर देतात ते. तेव्हा काय आहेत करणचे प्रश्न आणि यश-रुहीनी कशी दिली आहेत उत्तरं वाचा..

करण जोहरने नुकताच एक व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये करण त्याच्या मुलांना काही प्रश्न विचारतोय. करणने सगळ्यात पहिला प्रश्न यशला विचारलाय की 'घरातील त्याची आवडती व्यक्ती कोण आहे?' यावर यशने 'यश आणि रुही' असं उत्तर दिलंय. करण दुसरा प्रश्न रुहीला विचारतो की 'तिच्या नजरेत सगळ्यात कूल व्यक्ती कोण आहे?' यावर रुही बोलते 'निलम टिचर.' त्यावर लगेचच करण तिला विचारतो की 'सगळ्यात हँडसम कोण आहे?' यावर रुही यशचं नाव घेते तर सर्वात सुंदर व्यक्तीसाठी यश रुहीचं नाव घेतो.

त्यानंतर करण त्यांना दोघांपैकी एक पर्याय निवडायला सांगतो. करण आधी रुहीला विचारतो की तिला 'कोणासोबत खेळायला आवडेल? अब्राम की तैमुर?' यावर रुही तैमुरचं नाव घेते तर यश अब्रामचं नाव घेतो.

करणने सोशल मिडियावर शेअर केलेला हा व्हिडिओ यश आणि रुहीच्या क्युट उत्तरांमुळे व्हायरल होतोय. चाहत्यांना त्यांना निरागसपणा खूप भावतोय. करणने विचारलेल्या अब्राम आणि तैमुरच्या प्रश्नावर चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येतोय. 

karan johar played rapid fire round with yash and roohi  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT