Karan Johar: 'Showtime'a New Series to reveal secrets of bollywood Google
मनोरंजन

karan Johar च्या आगामी शो ची सेलिब्रिटींमध्ये दहशत, 'Showtime' चा पॅटर्न एकदम हटके...

कॉफी विथ करण 7 या चॅट शो प्रमाणेच करणचा 'शोटाईम' देखील OTT प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाणार आहे.

प्रणाली मोरे

Karan Johar: करण जोहर त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठं सरप्राइज घेऊन येत आहे. आतापर्यंत त्यानं कॉफी विथ करण हा शो होस्ट केलेला आपण पाहिलाय. या शो मध्ये तो गेस्ट म्हणून येणाऱ्या सेलिब्रिटींच्या थेट वैयक्तिक आयुष्यात डोकावून अनेक खळबळजनक गोष्टी समोर आणतो. पण आता तोआणखी एक नवीन शो घेऊन येत आहे,ज्याच्यात तो बॉलीवूडची अनेक गुपितं समोर आणताना दिसणार आहे. थोडक्यात बॉलीवूडच्या त्या अंधाऱ्या गल्लीत तो आपल्याला नेणार जी कदाचित बॉलीवूडची डार्क साईड असेल. कॉफी विथ करणचा ७ वा सिझन सुरु असतानाच त्याच्या ८ व्या सिझनचीही चर्चा सुरू झाली आहे. चला आता थोडक्यात करणच्या नवीन शो विषयी जाणून घेऊया.(Karan Johar: 'Showtime'a New Series to reveal secrets of bollywood)

करण सध्या 'कॉफी विथ करण' चा ७ वा सिझन होस्ट करत आहे, हा शो डिस्ने प्लस हॉट स्टारवर स्ट्रीम होत आहे. आता करण जोहर एक नवीन वेब सिरीज घेऊन येत आहे,जो त्याचा सर्वात आवडता विषय बॉलीवूडचे सीक्रेट्सवर आधारित असणार आहे. हा शो डिस्ने प्लस हॉट स्टारवरच स्ट्रीम होणार आहे. यासंदर्भात ग्लोबल डिस्ने फॅन इव्हेंट The D23 Expo मध्ये सांगितलं गेलं. या शो चे नाव 'शोटाईम' असे असेल. या OTT प्लॅटफॉर्मने एकत्र तीन अनाउन्समेंट केल्या आहेत. दुसरी अनाऊन्समेंट करणच्या 'कॉफी विथ करण' च्या ८ व्या सिझन संदर्भात आहे.

कॉफी विथ करणच्या ७ व्या सिझनविषयी बोलायचं झालं तर सारा अली खान,जान्हवी कपूर,विजय देवरकोंडा,समंथा रुथ प्रभू,टायगर श्रॉफ,क्रिती सनन,अक्षय कुमार,कतरिना कैफ,विक्की कौशल,ईशान खट्टर,सिद्धांत चतुर्वेदी सारख्या स्टार्सनी आतापर्यंत हजेरी लावली आहे आणि आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले आहेत.

'कॉफी विथ करण' या शो चा नवीन सिझनही ओटीटीवरच येणार आहे. आणि या शो ला करणच होस्ट करणार आहे. 'कॉफी विथ करण' या शो ची सुरुवात २००४ मध्ये झाली होती आणि २०१९ पर्यंत हा शो स्टार वर्ल्ड या वाहिनीवर प्रक्षेपित केला जायचा.

'शोटाईम' आणि 'कॉफी विथ करण ८' व्यतिरिक्त डिस्ने प्लस हॉटस्टारवर 'महाभारत'ही लवकरच सुरु होणार आहे. या सर्व शो ची पहिली झलकही लवकरच आपल्याला पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महात्मा गांधींच्या पुतळ्याला भाजपची टोपी, हातात पक्षाचा झेंडा; NDAच्या शिबिरात नेत्यांचा प्रताप, काँग्रेसचा हल्लाबोल

Maharashtra Politics : ३२ टक्के राजकारणी घराणेशाहीचे प्रतिक; ‘एडीआर’च्या अहवालातील महाराष्ट्राची स्थिती

Pune News : पुण्यातील शेतकऱ्याच्या अनोख्या आंदोलनाची चर्चा; तीन वेळा आमरण उपोषण करूनही दखल नाही, आता थेट कारवरच...

IND vs PAK Asia Cup 2025: पहलगाम हल्ल्यानंतर युद्ध केलंत, तेही नीट केले नाही, मागे हटायला...; पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Wholesale Inflation India : घाऊक महागाईचा दर वाढला! 4 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली आकडेवारी, सामान्य जनतेला फटका

SCROLL FOR NEXT