karan johar and shah rukh khan  Sakal
मनोरंजन

Karan Johar On Pathaan: 'प्रेम नेहमी...' करण जोहरने हेटर्सला दिले चोख प्रत्युत्तर

या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या बातमीने करण जोहर खूश आहे.

सकाळ डिजिटल टीम

सुपरस्टार शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने देशभरात निषेध आणि बहिष्काराचा ट्रेंड असतानाही बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या बातमीने करण जोहर खूश आहे. एक पोस्ट शेअर करताना, त्याने शाहरुख खान आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे आणि हेटर्सना सडेतोड उत्तर दिले आहे.

इन्स्टा स्टोरीवर पठाण चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना करण जोहरने कॅप्शनमध्ये लिहिले, 'एका दिवसात 100 कोटी! मेगास्टार शाहरुख खान, YRF आणि आदि (आदित्य चोप्रा), सिड (सिद्धार्थ आनंद) दीपिका, जॉन खूप चांगले'. करण जोहरने कॅप्शनच्या शेवटी लिहिले, 'प्रेमाचा नेहमी द्वेषावर विजय होतो. ही तारीख लक्षात ठेवा'.

यापूर्वी करण जोहरने शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाचे कौतुक केले होते. करण जोहरने लिहिले, “चित्रपट पाहताना याआधी मी इतके कधी एन्जॉय केलेले मला आठवत नाही. पठाण हा सगळ्यात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. शाहरुखचे स्टारडम, चार्म, करिष्मा, सर्वांचे लक्ष वेधून घेणारी एजंट दीपिका पदुकोण आणि सगळ्यात उत्कृष्ट व्हिलन जॉन अब्राहम. पुढे म्हणाला, चित्रपटात सिद्धार्थ आनंदच उत्कृष्ट दिग्दर्शन कौशल्य दिसत आहे. आदित्य चोप्राचा मला अभिमान वाटतो".

karan johar

शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाने भारतातील सर्व भाषांमध्ये पहिल्याच दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यात तमिळ आणि तेलुगू व्हर्जनच्या कमाईचाही समावेश आहे. शाहरुख खान चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर परतला आहे. तो शेवटचा झिरो चित्रपटात दिसला होता, ज्यामध्ये त्याने कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत काम केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT