karan johar and anushka sharma
karan johar and anushka sharma Sakal
मनोरंजन

Karan Johar: दीपिकासमोर करण जोहरने केले अनुष्का शर्माबद्दल धक्कादायक विधान, म्हणाला...

Aishwarya Musale

करण जोहर सध्या त्याच्या जुन्या व्हिडिओंमुळे चर्चेत आहे. जेव्हा खुद्द करण जोहरने खुलासा केला की त्याला अनुष्का शर्माचे करिअर बरबाद करायचे आहे. हा व्हिडिओ पुन्हा समोर आल्यानंतर अनेक चित्रपट कलाकारांनी करण जोहरवर निशाणा साधला आणि त्याला वाईट म्हटले आहे.

कंगनाने तर करण जोहरला चाचा चौधरी असे म्हटले आहे. त्याचवेळी करणचा आणखी एक व्हिडिओ समोर येत आहे, ज्यामध्ये तो कॉफी विथ करणमध्ये प्रियांका चोप्रासोबत सामील झाला होता आणि अनुष्का शर्माबद्दल बोलला होता. हा व्हिडीओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या आनंदाचा पारावार उरला नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ 2013 मध्ये करण जोहरच्या कॉफी विथ करणच्या एका भागाचा आहे. या एपिसोडमध्ये दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा एकत्र दिसल्या होत्या. संभाषणादरम्यान, दीपिका करणला सांगते, 'हे एक चुकीचे म्हणले जाते की, अभिनेत्री या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत.' मग करण म्हणतो, तुझ्याकडे नक्की कोण आहे?" दीपिका नंतर त्याला सांगते की तिची अनुष्का आणि कतरिना कैफशी मैत्री आहे. यावर करण म्हणाला की, तू काय म्हणाली, कोणाचे नाव घेत आहे?

'तु अनुष्काशी फ्रेंडली आहे, हे ऐकून मला खूप धक्का बसला. करणने पुन्हा विचारले, तू कोणासोबत फ्रेंडली आहे? 'माझे डोके ठिक आहे आणि मी बरोबरच बोलत ...'. दीपिका म्हणते. 'तु अनुष्का शर्माची मैत्रीण आहे असे तुला वाटत असेल, तर तू नक्कीच स्वप्नाच्या दुनियेत जगत आहे.'

करण जोहरचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय. म्हणजेच दीपिका ही अनुष्काला आपली मैत्रीण म्हणत आहे, यामध्येही करणला समस्या आहे. करण जोहरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परत एकदा तो नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: बारावीच्या परीक्षेचा निकाल आज; असा पाहा ऑनलाइन पद्धतीने निकाल

Loksabha Election: महाराष्ट्र सर्वात मागे, लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची आडेवारी समोर

आजचे राशिभविष्य - 21 मे 2024

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

SCROLL FOR NEXT