karan johar 
मनोरंजन

नेटकऱ्यांनी करण जोहरला केलं ट्रोल; म्हणाले, 'गॉड ऑफ नेपोटिझम!' 

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलिवूडमधील स्टार किड्सचा गॅड फादर म्हणून ओळखला जाणारा दिग्दर्शक म्हणजे करण जोहर. त्याने अनेक स्टार किड्सला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये लॉंच केले आहे. करणचं धर्मा प्रोडक्शन नावचे प्रोडक्टशन हाऊस आहे. नुकताच धर्माच्या ऑफिशल सोशल मिडीया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट झाला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर दिसत आहे. करण जोहर धर्मा प्रोडक्टशनतच्या नव्या प्रोजेक्टमधून शनाया कपूरला लॉंच करणार आहे. शनायाने देखील धर्मा प्रोडक्शनचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हिडीओ शेअर करत ही बातमी दिली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना शनायाच्या सौंदर्याचे कौतुक देखील केले. मात्र, त्यापेक्षाही जास्त करण जोहरला टार्गेट करण्यात आले. परत एकदा लोकांनी करणवर नेपोटिझमचा आरोप केला आहे.

शनायाच्या आधी करणने आलिया भट्ट, वरुण धवन, जान्हवी कपूर, ईशान खट्टर, अनन्या पांडे अशा बॉलिवूड स्टारकिड्सना लाँच केले आहे. आता एक अशीही चर्चा सुरू आहे की, करण लवकरच जान्हवीची छोटी बहीण खुशी कपूर आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान यांनाही तो बॉलिवूडमध्ये लाँच करणार आहे.

करणला नेपोटीझम किड्ससाठी गॉड फादर आहे असे सोशल मिडीयावर म्हटले जात आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या अंतर्गत फक्त स्टार किड्सनाच बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी देतो सामान्य स्ट्रगलिंग अॅक्टरला संधी देत नाही असे म्हणत नेटकऱ्यांनी करण जोहरला ट्रोल केले. शनायाला लॉंच केल्याने आता करणला अणखी ट्रोल केले जात आहे. सध्या ‘गॉड ऑफ नेपोटिझम’ असे नाव सोशल मिडीयावर दिले जात आहे.

सर्वात आधी कंगना रणावतने करण जोहरला नेपोटिझमबद्दल ट्रोल केले होते. त्यानंतर सोशल मिडीयावर हा मुद्दा खूप गाजला. करणच्या नेपो किड्ससोबच्या स्टुडण्ट ऑफ द इयर, ए दिल है मुश्किल, स्टुडण्ट ऑफ द इयर, कलंक या चित्रपटांना प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT