Karan Johar  esakal
मनोरंजन

Karan Johar: "आईसाठी टाईमपास म्हणून सून आण!", म्हणणाऱ्या नेटकऱ्याचे करणने उपटले कान, म्हणाला...

करण जोहरची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे.

Vaishali Patil

बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. करणचे नाव अनेकदा वादात सापडते. बॉलीवूड सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्यापासून ते व्यावसायिक जीवनापर्यंत कुठे ना कुठे करण जोहरच्या नावाचा उल्लेख असतोच.

करण सध्या कॉफी विथ करणमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये नुकतेच सैफ अली खान आणि त्याची आई अभिनेत्री शर्मिला टागोर दिसले. या शोमुळे करणला नेटकरी नेहमीच ट्रोल करत असातत. मात्र आता करण वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

आता करण जोहरने सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्याला चांगलेच फटकारले आहे. एका नेटकऱ्याने चित्रपट निर्माता करण जोहरला आईचा टाइमपास व्हावा यासाठी सुनेला घरी आणण्यास सांगितले, ज्यावर करण चांगलाच संतापला. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीजवर पोस्ट शेअर करून ट्रोल्सवर टीका केली आहे.

एकाने कमेंटमध्ये लिहिले होते की, 'आईसाठी सून आण, तिचा टाईमपास होत नाही.' त्या नेटकऱ्यांला उत्तर देत करणने सांगितलं, कोणत्याही सुनेने कोणाच्याही आईसाठी टाईमपास बनू नये. सुनेची स्वतःची ओळख असते.

करण जोहरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे. ज्यात त्याने लिहिले की, 'मी ही पोस्ट त्या सर्व मुर्ख ट्रोलर्ससाठी लिहित आहे जे माझ्या आयुष्याच्या निवडीबद्दल ज्ञान देतात आणि अपशब्द वापरतात.

मला अशा कमेंट्स खूप वाईट वाटतात, पहिली गोष्ट म्हणजे सून म्हणजे कोणत्याही आईचा टाईमपास नसतो. हे एक लेबल आहे ज्याकडे लोक फक्त सामान म्हणून पाहतात. सून ही एक माणुस आहे, तिला तिच्या आवडीनुसार वेळ घालवण्याचा अधिकार आहे, मग ती वैयक्तिक असो वा व्यावसायिक. मी सर्वांना सांगतो की माझी आई आणि मी मुलांचे संगोपन करतो.

करण जोहरनेने पुढे लिहिले - 'तिला किंवा मला कोणत्याही 'टाईमपास'ची गरज नाही, तिचे आयुष्य आम्हाला प्रेम देण्यात पूर्ण आहे आणि आम्ही देखील तिच्यावर तितकेच प्रेम करतो आणि 'सून' आणणे हा पर्याय नाही आहे.

मी हे त्या लोकांना सांगत आहे ज्यांना माझ्या वैयक्तिक आयुष्याची आणि नातेसंबंधांची जास्त काळजी आहे. माझी मुले भाग्यवान आहेत की त्यांना मार्गदर्शन करणारी आई मिळाली. मला आयुष्यात कधी जोडीदाराची गरज भासली तर मी ते माझ्यासाठी करेन. इतर कोणासाठी नाही. माझे ऐकल्याबद्दल धन्यवाद.

सध्या करणची पोस्ट सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी आणि अनेक कलाकारांनी त्याच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. त्याचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Municipal Election : मुंबईसाठी ‘राष्ट्रवादी’ची यादी जाहीर; भाजपला धक्का, मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी

Video: 'त्या' एका व्हिडिओमुळे जान्हवी किल्लेकर ट्रोल, संतापून उत्तर देत म्हणाली...'पुर्णपणे माहिती नसताना...'

Latest Marathi News Live Update : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सेंगरच्या जामिनाच्या विरोधात आज सुनावणी

BMC Election नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर आणि किरीट सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी, एबी फॉर्मचं वाटप सुरू

farmer Success Story: माळरानावर फुलवली बोरांची बाग; कष्टातून मिळतय अडीच लाखांचे उत्पादन ; बोधेगावातील तरुणाचा यशस्वी प्रयोग!

SCROLL FOR NEXT