Karan Kundrra -Tejasswi Prakash Romantic Video Esakal
मनोरंजन

Karan-Tejasswi Video: 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे', तेजस्वी अन् करणचं डान्स करताना सुटलं भान! लिप-लॉक व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही जगतातील सर्वात प्रसिद्ध आणि रोमँटिक जोडप्यांपैकी एक जोडपं म्हणजे तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा. ही जोडी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत राहते. करण आणि तेजस्वीची जोडी प्रेक्षकांना खुप आवडते. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात.

आताही या जोडप्याचा एक रोमँटिक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघे एकमेकांच्या खूप जवळ आणि किस करतांना दिसत आहेत.खरे तर करण आणि तेजस्वीने नुकतेच एका बर्थडे पार्टीमध्ये डान्स केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

करण आणि तेजस्वी यांनी अलीकडेच त्यांची मैत्रीण जेसिका खुरानाच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. हा व्हिडिओ 12 एप्रिलच्या रात्रीचा आहे, जो सध्या व्हायरल झाला आहे. मात्र, दोघांनाही चाहत्यांकडून खूप प्रेम मिळत असते. त्यांच्या रोमान्सबाबत काही लोक त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करत आहेत. किसिंगचा हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तेजस्वी तिच्या 'नागिन 6' शोमध्ये व्यस्त आहे आणि करण 'इश्क में घायल' या शोमध्ये दिसत आहे. 'बिग बॉस 15' मधील त्यांच्या रोमान्सच्या बातम्यांनी खूप रंगल्या. करण आणि तेजस्वीच्या प्रेमाची सुरुवात 'बिग बॉस 15'मध्ये झाली होती.

यानंतर शोमधून बाहेर आल्यानंतरही दोघेही एकत्र वेळ घालवत राहिले आणि शो संपल्यानंतरही त्यांची प्रेमाने भरलेली केमिस्ट्री पाहून चाहत्यांना खूप आनंद झाला. नेटकरी या दोघांना प्रेमाने तेजरन म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT