karan mehra,nisha rawal  file photo
मनोरंजन

विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपांवर करणचं स्पष्टीकरण; म्हणाला..

पत्नी निशा रावलने करणवर विवाहबाह्य संबंध असल्याचे केले आरोप

स्वाती वेमूल

अभिनेता आणि पती करण मेहराचे Karan Mehra विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप पत्नी आणि अभिनेत्री निशा रावलने Nisha Rawal केला. निशाने करणविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी त्याला अटक करण्यात आली. जामिनावर सुटल्यानंतर करणने निशाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. करणचे टेक्स्ट मेसेज वाचल्यानंतर त्याच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाल्याचं निशाने माध्यमांशी बोलताना सांगितलं. इतकंच नव्हे तर करणनेही ते मान्य केल्याचं ती म्हणाली. दुसरीकडे करणने विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप फेटाळले आहेत. (Karan Mehra reacts to Nisha Rawals allegations of extramarital affair)

"हे सर्व आरोप माझ्यावर केले जाणारच होते आणि मला अनेकांशी जोडलं जाणार आहे. या सर्व गोष्टी तथ्यहीन आहेत. मी तिची फसवणूक केलीच नाही आणि माझे कुठलेही विवाहबाह्य संबंध नाहीत", असं करणने स्पष्ट केलं. निशाने करणवर मारहाणीचेही आरोप केले आहेत. "मुलाखातर आणि करणवर असलेल्या प्रेमाखातर मी इतके दिवस शांत बसले होते", असं ती म्हणाली.

'निशानेच स्वत:चं डोकं भिंतीला आपटलं आणि माझ्यावर आरोप केले'

"आमच्या वैवाहिक आयुष्यात काही वाद सुरू आहेत. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असून ३१ मे रोजी आम्ही त्याविषयी चर्चा करत होतो. मी तिला जे देऊ शकतो, त्याहूनही अधिक गोष्टींची मागणी निशा करत होती. मला ते पटलं नाही. वादानंतर निशा आणि तिचा भाऊ रोहित सेठिया घराबाहेर गेले आणि रात्री परत आले. निशाच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर कोर्टात धावू घेऊ, असं तिच्या भावाने म्हटलं. मी सुद्धा त्यांना थांबवलं नाही. त्यानंतर निशा अचानक माझ्या बेडरुममध्ये आली आणि माझ्याशी ओरडून बोलू लागली. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन, अशा धमक्या ती देत होती. मी शांतपणे तिला समजावून सांगत होतो आणि तिला तिच्या बेडरूममध्ये जाण्याची विनंती केली. मी पुन्हा झोपण्यासाठी माझ्या बेडरुममध्ये आलो तेव्हा तिने स्वत:चं डोकं अचानक भिंतीला आपटलं आणि आता माझ्यावर मारहाणीचे आरोप करतेय. 'आता बघ काय होईल', अशी धमकीच तिने मला दिली. निशाला तिच्या रागावर अजिबात नियंत्रण नाही. तिच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनीही तिचं हे वागणं पाहिलंय. पाच-सहा वर्षांपूर्वी तिला 'बायपोलार'चं निदान झालं होतं. आता मला हे आणखी सहन होणार नाही", असं करण म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी ३०० लोकल रद्द; १८ जानेवारीपर्यंतचा ब्लॉक कसा असेल?

Wai Crime : वृद्ध महिलेला मारहाण करून दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास; वाई‑पसरणी परिसरात खळबळ!

Mohol News : मोहोळ परिसरात होणाऱ्या अपघातांना जबाबदार कोण; वाहन चालवणाऱ्याची बेदरकारी की पालकांचं दुर्लक्ष!

BMC निवडणुकांचा फटका मुंबईकरांच्या आरोग्याला! ८०% कर्मचारी निवडणूक ड्युटीवर, मतदान महत्त्वाचे की उपचार?

Latest Marathi News Live Update : नवी दिल्लीत 'दहशतवादविरोधी परिषद-२०२५' चे उद्घाटन

SCROLL FOR NEXT