Karan Mehra and Nisha Rawal 
मनोरंजन

त्या रात्री नेमकं काय झालं? जामिनावर सुटलेल्या करणचं स्पष्टीकरण

पत्नीने केलेल्या मारहाणीच्या तक्रारीनंतर करणला झाली होती अटक

स्वाती वेमूल

'ये रिश्ता क्या कहलाता है' Yeh Rishta Kya Kehlata Hai या मालिकेत नैतिकची भूमिका साकारून प्रकाशझोतात आलेला अभिनेता करण मेहराला Karan Mehra १ जून रोजी अटक करण्यात आली. पत्नी निशा रावलने Nisha Rawal मारहाणीची तक्रार दाखल केल्यानंतर करणला अटक झाली. सोमवारी रात्री करणने मारहाण केल्याचा आरोप निशाने केला आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं, याचा खुलासा करणने जामिनावर सुटल्यानंतर केला आहे. (Karan Mehra reveals what happened with wife Nisha Rawal ahead of arrest)

"आमच्या वैवाहिक आयुष्यात काही वाद सुरू आहेत. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू असून ३१ मे रोजी आम्ही त्याविषयी चर्चा करत होतो. मी तिला जे देऊ शकतो, त्याहूनही अधिक गोष्टींची मागणी निशा करत होती. मला ते पटलं नाही. वादानंतर निशा आणि तिचा भाऊ रोहित सेठिया घराबाहेर गेले आणि रात्री परत आले. निशाच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर कोर्टात धावू घेऊ, असं तिच्या भावाने म्हटलं. मी सुद्धा त्यांना थांबवलं नाही. त्यानंतर निशा अचानक माझ्या बेडरुममध्ये आली आणि माझ्याशी ओरडून बोलू लागली. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त करेन, अशा धमक्या ती देत होती. मी शांतपणे तिला समजावून सांगत होतो आणि तिला तिच्या बेडरूममध्ये जाण्याची विनंती केली. मी पुन्हा झोपण्यासाठी माझ्या बेडरुममध्ये आलो तेव्हा तिचं डोकं अचानक भिंतीला आपटलं. 'आता बघ काय होईल', अशी धमकीच तिने मला दिली. निशाला तिच्या रागावर अजिबात नियंत्रण नाही. तिच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनीही तिचं हे वागणं पाहिलंय. पाच-सहा वर्षांपूर्वी तिला 'बायपोलार'चं निदान झालं होतं. आता मला हे आणखी सहन होणार नाही", असं करण म्हणाला.

करण आणि निशाने त्यांच्या घरात सीसीटीव्ह कॅमेरा लावले होते. मात्र रात्री घडलेल्या घटनेपूर्वी निशाने कॅमेरा ऑफ केल्याचा आरोप करणने केला आहे. या संपूर्ण प्रकरणी अद्याप निशाने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. करण आणि निशा गेल्या १४ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. २०१२ मध्ये या दोघांनी लग्न केलं असून त्यांचा चार वर्षांचा मुलगा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT