मनोरंजन

75 दिवस झाले अजून भेट नाही, करणला येते 'छोट्या मेहराची आठवण'

टीव्ही अभिनेता करण मेहरा karan mehre हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे.

युगंधर ताजणे

टीव्ही अभिनेता करण मेहरा karan mehre हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे. त्याचे कारण त्याच्यावर पत्नी निशा रावलनं केलेले गंभीर आरोप. त्या आरोपांमध्ये करणवर कौटूंबिक हिंसाचार domestic violence केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्या आरोपांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून निशा रावल आणि करण मेहरा हे दोघेही चर्चेत आहे. त्याचे कारण त्यांचे वाद. त्या वादामध्ये त्यांच्या मुलावरुन अनेक प्रतिक्रिया सेलिब्रेटींनी दिल्या आहेत. त्यासंबंधी करणची एक पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यानं आपल्याला गेल्या ७५ दिवसांमध्ये खूप वेगळा अनुभव आला. त्या अनुभवाविषयी त्यानं पोस्ट केली आहे.

पत्नी निशा रावलनं केलेल्या आरोपानंतर करणला अटक करण्यात आली होती. या दोघांना काविश नावाचा मुलगा आहे. तो सध्या त्याच्या आईसमवेत आहे. करणनं जो एक व्हिडिओ शेयर केला आहे त्यात त्यानं आपल्या मुलाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्याला मुलाची आठवण येत असून आपण त्याच्या भेटीसाठी आतूर आहोत. असं तो त्या व्हिडिओमध्ये सांगताना दिसत आहे. त्या व्हिडिओमध्ये काविश दिसतो आहे. त्याच्यासोबत करणनही आहे. त्यावर करण म्हणतो ७५ दिवस झाले. माझी आणि काविशची भेट नाही. मी अजून छोट्या मेहराला भेटलेलो नाही. त्याच्या भेटीसाठी दिवस मोजतो आहे. निशानं करणवर केलेल्या आरोपांमुळे करणची चांगलीच बदनामी झाली होती. त्यावर त्यानं अनेक व्हिडिओ शेयर करुन आपली बाजुही मांडली होती.

निशानं गोरेगाव पोलीस ठाण्यात करणविरोधात तक्रार दाखल केली होती. काही काळ त्यांच्या वैवाहिक आयुष्यात सगळं आलबेल होतं. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्यातील वाद सोशल मीडियावर आले आणि चाहत्यांना धक्का बसला. २४ नोव्हेंबर २०१२ मध्ये करण आणि निशाचे लग्न झाले होते. करणनं त्याच्या करिअरची सुरुवात स्टार प्लसवरील ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेपासून केली होती. त्या मालिकेत त्यानं नैतिक सिंघानिया नावाची भूमिका केली होती. ती लोकप्रिय झाली.

या मालिकेनंतर अमाप लोकप्रियता करणला मिळाली. तो स्टार झाला. त्यानंतर तो नच बलिएच्या पाचव्या सीझनमध्येही दिसला. बिग बॉसच्या दहाव्या पर्वातही त्यानं सहभाग घेतला होता. यावेळीही त्याला प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या करणाला निशानं केलेल्या आरोपांना सामोरं जाताना मोठ्या त्रासाला तोंड द्यावं लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''मी निवडून आलोय, आत जाऊ द्या!'' फरशी कारागीराला पोलिसांनी बाहेरच अडवलं; माजी उपनगराध्यक्षाचा केला पराभव

Solapur Cyber Crime : आरटीओ ई-चलानच्या नावाखाली मोबाईल हॅक; ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक!

Pachod Crime : वाढदिवसाला डीजे वाजवण्यावरून वाद ; दुचाकी पेटवणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले!

सोलापुरात गुन्हा दाखल! मी पत्रकार आहे म्हणून शिवभोजन केंद्रचालकांकडून दरमहा घेतला हप्ता; घराचे बांधकाम सुरु असल्याने हप्ता वाढवून मागितला अन्‌...

Karad Krushi Pradarshan : एआय तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी आर्थिक सक्षम होणार; कऱ्हाड कृषी प्रदर्शनात पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास!

SCROLL FOR NEXT