Karan Veer Mehra Divorced Esakal
मनोरंजन

Karan Veer Mehra Divorced:"आम्ही कधीच वेगळे झालोय..", दोन वर्षातच अभिनेता करण वीर मेहराचा घटस्फोट! दुसरे लग्नही मोडले

Vaishali Patil

Karan Veer Mehra Divorced: पवित्र रिश्ता अभिनेता करण वीर मेहराबाबत एक बातमी समोर आली आहे. अभिनेता करण वीर मेहरा हा त्याच्या पत्नीपासून वेगळा झाला आहे. करण वीर मेहरा आणि निधी सेठ यांचा घटस्फोट झाला आहे. स्वत: निधीनं याबाबत खुलासा केला आहे.

24 जानेवारी 2021ला दिल्लीतील गुरुद्वारामध्ये करण वीर मेहराने एका खाजगी समारंभात निधी सेठसोबत लग्न केले होते. ज्याचे फोटो सोशल मिडियावर खुपच व्हायरल झाले होते.

करण आणि निधी यांच्या नात्यात गेल्या अनेक दिवसांपासून खटके उडत होते. त्यांच्या नात्यातील दुरावा वाढल्यामुळे दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

निधीने टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, करणने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

याबद्दल बोलताना निधी म्हणाली की, 'हो, तीन महिन्यांपूर्वी आमचा घटस्फोट झाला आहे. वर्षभरापूर्वी आम्ही वेगळे झालो होतो. मला असं वाटतं की नात्यात रोजची भांडणे ही असह्य असतात. आजही लोकांना वागणूक आणि माणसांबद्दल माहिती नसते ज्यामुळे नातेसंबंध बिघडतात. अशा परिस्थितीत आपण कधीही एकत्र राहू शकत नाही.

वैवाहिक जीवनात मानसिक शांतता, एकमेकांचा आदर, प्रामाणिकपणा आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं खुप महत्त्वाचं आहे.''

करण वीर मेहराचे हे दुसरे लग्न होते. त्याने 2009 मध्ये त्याची बालपणीची मैत्रिण देविकासोबत पहिले लग्न केले आणि 2018 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्याने निधीसोबत विवाह केला मात्र या नात्याचाही आता शेवट झाला आहे.करण आणि निधीची पहिली भेट 2008 मध्ये एका कमर्शियलच्या सेटवर झाली होती.

निधीने 'मेरे डॅड की दुल्हन', 'किस्मत का खेल' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि '२' किस्मत का खेल आणि श्रीमद भागवत महापुराण यांसारख्या शोमध्ये काम केले आहे. निधी बेंगळुरूला शिफ्ट झाली असून ती तिच्या आई-वडिलांसोबत राहत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

Wimbledon 2026: यानिक सिनरचा डबल धमाका! सलग दुसऱ्यांदा उंचावली ट्रॉफी, ३ तास ४६ मिनिटांचा थरारक सामना...

Medha Manjrekar Cancer: मेधा मांजरेकरांच्या कॅन्सरवर लेक सईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली- आई तू खूप...

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मोठा धक्का ! ९२ लाख महिलांची नावे वगळली; 'ही' मोठी कारणे आली समोर

SCROLL FOR NEXT