Kareena Kapoor,Amrita Arora,Malaika arora Instagram
मनोरंजन

करिनाला शहाणपण येईना;कोरोना गेला उडत म्हणत 'ही' गोष्ट केली...

करिष्मा कपूरच्या घरी आयोजित केलेल्या पार्टीचे फोटो व्हायरल...

प्रणाली मोरे

करिना कपूर(Kareena Kapoor) काही दिवसांपूर्वीच कोरोनातून बरी झाली आहे. कोरोना झाल्यामुळे कसं आपल्याला कुटुंबापासून,नवरा आणि मुलांपासून लांब राहावे लागत आहे यासंदर्भातल्या इमोशनल पोस्ट ती प्रत्येक दिवशी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरनं शेअर करीत होती. खरंतर करण जोहरच्या घरी पार्टीला त्याच्या भावकीतलं अर्ध बॉलीवूड गेलं अनं लगोलग अनेकांना कोरोनानं गाठलं ना राव. आता यात आपल्या करिना मॅडमही होत्या. त्यांची मैत्रिण अमृता अरोराही सामिल होती.

Karrena Kapoor,Saif Ali Khan,Taimur Ali Khan

त्यानंतर यांच्या पार्ट्यांना अंकुश घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं फतवाच काढला जमाव बंदीचा. म्हणजे आली नं पार्ट्यांवर बंदी. बरं या मोठ्या लोकांना या सगळ्यामुळे शहाणपण आलं असेल असं वाटत असतानाच तिनं असं काही केलंय की,'आता रे अक्कल गहाण ठेवली का' अशी म्हणायची पाळी आली नं. तर त्याचं झालं असं की करिना बरी झाल्याच्या निमित्तानं खूश होऊन तिच्या मोठ्या बहिणीनं म्हणजे करिष्मानं पार्टीचं आयोजन केलं होतं.

Arjun Kapoor

पार्टीत करिना कपूर-खान,तिचा नवरा सैफ अली खान,मुलगा तैमूर अली खान, तिची खास मैत्रिण अमृता अरोरा,तिचा नवरा,अमृताची मोठी बहिण मलायका अरोरा आणि तिचा बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर असे सगळे सामिल झाले होते. स्वतः करिनानं तिच्या इन्स्टाग्रामवर पार्टीचे फोटो शेअर करत म्हटलं आहे,'वुई आर बॅक'. आता तिची ही काही पहिलीच पार्टी नाही तर बाईंचे रीपोर्ट ज्या दिवशी निगेटीव्ह आले त्याच्या दोन दिवसातंच कपूर कुटुंबियांकडे तिनं एक-दोन पार्ट्यांना हजेरी लावली होती. आता जर 'पब्लिक फिगर' म्हणून जे ओळखले जातात,लोकं त्यांना फॉलो करतात अशांनीच जर बेजबाबदार वागलं तर सर्वसामान्य नागरिकांनाच का फक्त फटकारायचं हा मुद्दा पुन्हा उठतोच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Electricity: राज्यात सर्वसामान्यांना २५ वर्षे मोफत वीज; १०० युनिटपर्यंत दिलासा, स्मार्ट योजनेसाठी महावितरणचा पुढाकार

Sourav Ganguly Video : महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नाही! सौरव गांगुलीचा जुना व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय म्हणाला होता? ऐका...

Success Story: एकाच वेळी मामा भाचे झाले क्लासवन अधिकारी; एमपीएससी परीक्षेत शिर्ल्याच्या मामा भाच्यांची दमदार कामगिरी

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात चौथ्या वाघावर शिक्कामोर्तब, कुंभार्ली घाटात वाघाचे दर्शन

Winter Body Detox: औषधांची गरज नाही; हिवाळ्यात शरीर डिटॉक्स करण्याचे ५ सोपे उपाय

SCROLL FOR NEXT