Kareena Kapoor , Salman Khan Esakal
मनोरंजन

Kareena Kapoor: घराच्या बाथरुममध्ये लावलेले सलमानचे फोटो एकाक्षणी टराटरा फाडून टाकलेले करीनानं..काय होतं कारण?

सलमान खाननं एका कार्यक्रमा दरम्यान करीना कपूरचा हा किस्सा शेअर केला होता,जो त्याही बेबोची मोठी बहिण करिश्मानं सांगितला होता.

प्रणाली मोरे

Kareena Kapoor: सलमान खानचा जेव्हा 'मैने प्यार किया' सिनेमा रिलीज झाला होता तेव्हा तो रातोरात स्टार बनला होता. या सिनेमाला मिळालेल्या यशानं सलमान मोठा स्टार बनला होता. करीना कपूर देखील त्याच्यावर त्या दरम्यान फिदा झाली होती.

तिनं चक्क आपल्या बाथरुममध्ये सलमान खानचं पोस्टर लावलं होतं. पण त्यानंतर काहीतरी असं घडलं की करीनानं सलमानचे ते पोस्टर टराटरा फाडून टाकले अन् राहुल रॉयचे पोस्टर त्याजागी लावले होते.

याचा खुलासा करत सलमाननं एकदा 'दस का दम' मध्ये केला होता. सलमाननं जे सांंगितलं ते ऐकून मोठा हशा पिकला होता. (Kareena Kapoor have salman khan photo in her bathroom but later tore it..know tha reason)

Kareena Kapoor , Salman Khan

सलमान खाननं आपल्या करियरमध्ये करिना कपूर आणि करिष्मा कपूर दोघींसोबत काम केलं. सलमान,करिश्मासोबत 'जुडवा','अंदाज अपना अपना' आणि 'जीत' सारख्या सिनेमांतून तो दिसला होता. तेव्हा करीना शाळेत शिकत होती. सलमाननं करिनाशी संबंधित किस्सा सांगितला जो खूप इंट्रेस्टिंग होता.

सलमान म्हणाला,''त्यावेळी करिश्मा आणि मी 'निश्चय' सिनेमाचं शूटिंग करत होतो. करिश्मानं मला सांगितलं की बेबोनं आपल्या बाथरूममध्ये माझं पोस्टर लावलं आहे. पण त्यानंतर आशिकी रिलीज झाला आणि बेबोनं माझं पोस्टर फाडून राहूल रॉयचं पोस्टर लावलं. करीना देखील स्वतः माझ्याजवळ येऊन म्हणाली की सलमान आता माझ्या बाथरूममध्ये तुझं पोस्टर नाही. आता तिथे राहुल रॉयचा फोटो आहे''.

'दस का दम' मध्ये करीना आणि करिश्मा देखील आल्या होत्या. हा किस्सा ऐकून करीना खो-खो हसली होती. त्यानंतर जेव्हा करीनानं सिनेमात एन्ट्री केली तेव्हा तिनं सलमानसोबत काही सिनेमे केले. यामध्ये 'बॉडीगार्ड','बजरंगी भाईजान','मै और मिसेस खन्ना' सारख्या सिनेमांचा समावेश आहे.

सलमानच्या आगामी प्रोजेक्ट्स विषयी बोलायचं झालं तर लवकरच तो 'टायगर ३' आणि 'टायगर वर्सेस पठाण' सिनेमात नजरेस पडेल. तर करीना 'क्रू' मध्ये तब्बू आणि क्रिती सननसोबत नजरेस पडेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT