Kareena to join Yash's Toxic: Esakal
मनोरंजन

kareena kapoor: टॉक्सिक मध्ये झळकणार बेबो! केजीएफच्या यश सोबत दिसणार बॉलीवूडची करिना?

Kareena to join Yash's Toxic: करीना कपूर खानही तिच्या साऊथ डेब्यूसाठी सज्ज झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहे.

Vaishali Patil

Kareena to join Yash's Toxic: सध्या साऊथ सिनेमांची चांगलीच हवा आहे. टॉलिवूड सिनेमे सुपर हिट होत असून आता हळू हळू बॉलिवूड स्टारही साऊथची वाट धरत आहेत. किंग खान म्हणजेच शाहरुख खानने देखील आता साऊथचा दिग्दर्शक अॅटलीसोबत जवानमध्ये काम केले. तर आता अभिनेत्री करिना कपुरही दक्षिणेकडे वळणार आहे.

आता करीना कपूर खानही तिच्या साऊथ डेब्यूसाठी सज्ज झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. मिडिया रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात येत आहे. तर आता करिना 'KGF' आणि 'KGF Chapter 2' सारखे सुपरहिट सिनेमे देणारा कन्नड सुपरस्टार यशसोबत काम करणार आहे.

कन्नड सुपरस्टार यशसोबत करीना कपूर काम करणार असल्याच्या चर्चांमुळे दोघांचे चाहते उत्सुक आहेत. साऊथचा सुपरस्टार यश सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो आता टॉक्सिक या चित्रपटात दिसणार आहे.

आता यशाच्या 'टॉक्सिक'मध्ये करिना मुख्य भूमिकेसाठी दिसणार आहेत. तर निर्मातेही करिनासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. इंडिया टुडेनुसार, यश आणि चित्रपटाचे निर्माते 'टॉक्सिक' साठी अशा अभिनेत्रीच्या शोधात होते जी केवळ प्रोजेक्टचा भाग होणार नाही तर प्रेक्षकांना आकर्षित करेल. त्यामुळे यासाठी करिना कपुरच्या नावाची चर्चा आहे. करिनाने 'टॉक्सिक' सिनेमास होकार दिल्यास हा तिचा पहिला साऊथ सिनेमा असेल.

गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. तर करीना रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन', 'द बकिंगहॅम मर्डर्स' आणि 'द क्रू' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

SCROLL FOR NEXT