Kareena Kapoor Khan 
मनोरंजन

Kareena Kapoor Khan: 'जब वी मेट'; जेव्हा शाहिद अन् करीना समोरासमोर येतात, व्हिडीओची सर्वत्र चर्चा

करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अभिनेता शाहिद कपूर ( Shahid Kapoor) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करीना ही शाहिदला इग्नोर करताना दिसत आहे.

priyanka kulkarni

Kareena Kapoor Khan: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा काल मुंबईत पाडला. अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याच्या रेड कार्पेटवरील सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सध्या अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि अभिनेता शाहिद कपूर ( Shahid Kapoor) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये करीना ही शाहिदला इग्नोर करताना दिसत आहे.

व्हिडीओ व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शाहिद हा चित्रपट निर्माते राज आणि डीके यांच्यासोबत रेड कार्पेटवर पोज देताना दिसत आहेत. तिघांच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. त्यानंतर करीना रेड कार्पेटवर होते. करीना ही राज आणि डिके यांना हॅलो करते पण ती शाहिदसोबत काहीच बोलत नाही.

पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

शाहिद आणि करीनाच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, "जसं करीना शाहिदला इग्नोर करत आहे, तसंच आयुष्यातील समस्यांना इग्नोर करा." तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, "जर हे दोघे कपल असले असते तर ही बॉलिवूडमधील बेस्ट जोडी असती."

करीना आणि शाहिद 2007 मध्ये एकमेकांना डेट करत होते. या दोघांनी कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलं. करीनानं शाहिदसाठी नॉन व्हेज खाणं सोडलं होतं, असं तिनं कॉफी विथ करण या कार्यक्रमात सांगितलं होतं. पण काही वर्षानंतर शाहिद आणि करीना यांचा ब्रेकअप झाला. करीनानं  2012 मध्ये सैफ अली खानसोबत लग्न केलं. तर शाहिदनं 2015 मध्ये मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT