Kareena Kapoor Khan Jokes her charactor geet from jab we met increased indian railway revenue,actress trolled Google
मनोरंजन

भारतीय रेल्वेची करिनानं उडवली खिल्ली, ऐकून भडकले लोक; म्हणाले,'ही किती...'

करिना कपूरनं काही दिवसांपूर्वी भारतीय रेल्वेवर हसत-हसत केलेल्या विधानानं आता वादाचं रुप घेतलं आहे.

प्रणाली मोरे

Kareena Kapoor On Indian Railway: बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर(Kareena Kapoor) नेहमीच तिच्या चाहत्यांची फेव्हरेट राहिली आहे. करिनाच्या कितीतरी भूमिकांना लोकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. त्यातलीच एक करिनानं साकारलेली भूमिका म्हणजे 'जब वी मेट'(Jab we Met) मधली गीत. करिनाची भूमिका लोकांच्या मनात आणि डोक्यात एकदम फीट बसलेली आहे. पण करिना कपूरनं आपल्या गीतच्या भूमिकेविषयी आता काहीसं असं विधान केलंय की त्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल(torlled) केलं जात आहे.(Kareena Kapoor Khan Jokes her charactor geet from jab we met increased indian railway revenue,actress trolled)

करिना कपूर खानने 'जब वी मेट' सिनेमात गीत ही भूमिका अतिशय सुंदर साकारली होती. तिच्या भूमिकेची खूप प्रशंसा करण्यात आली होती, सिनेमात करिना आणि शाहिदची पहिली भेट ही रेल्वेमध्येच झालेली दाखवली आहे. अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वीच म्हटलं होतं की 'जब वी मेट' मधील तिच्या भूमिकेनं भारतीय रेल्वेला भरपूर नफा(पैसा) मिळवून दिला आहे.

करिना कपूरनं जब वी मेट मधील आपल्या गीत या भूमिकेची आठवण काढताना म्हटलं की, तिच्या त्या भूमिकेमुळे भारतीय रेल्वेचा नफा होण्यास मदत मिळाली आहे. करिना म्हणाली की, ''मी गीत ही भूमिका साकारल्यानंतर हेरम पद्धतीच्या सिनेमात मी घातलेल्या पॅंट्सची मागणी वाढली आणि भारतीय रेल्वेच्या महसूलात देखील वाढ झाली आहे''.

करिनाचं हे वक्तव्य सध्या भलतंच चर्चेत आहे. रेल्वेची खिल्ली उडवल्या प्रकरणी बरेच लोक आता करिनाला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की,'करिना कपूरचं म्हणणं आहे की तिच्या 'जब वी मेट' मधील गीत व्यक्तिरेखेमुळे भारतीय रेल्वेच्या नफ्यात वाढ झाली आहे. ही प्रत्यक्ष परिस्थितीपासून किती दूर आहे.आणि मग या कलाकारांना आश्चर्य वाटतं की लोक आपल्याशी कनेक्ट का होत नाहीत'.

Kareena Kapoor trolled on twitter
Kareena Kapoor trolled on twitter
Kareena Kapoor trolled on twitter

तुमच्या माहितीसाठी इथं नमूद करतो की इम्तियाज अलीच्या दिग्दर्शना अंतर्गत बनलेल्या 'जब वी मेट' सिनेमात करिनानं गीत ही भूमिका साकारली होती. ती सतत आनंदी राहणारी, बडबड करणारी, छोट्या-छोट्या गोष्टीवर खूश होणारी मुलगी असते, जी एका ट्रेनमध्ये शाहिद कपूरला भेटते जो कायम दुःखी,उदास राहणारा माणूस असतो. सिनेमातील प्रेमकथा तेव्हा लोकांना खूपच भावली होती. करिनाच्या सिनेमांविषयी बोलायचं तर नुकतीच ती आपल्याला 'लाल सिंग चड्ढा'मध्ये दिसली. सिनेमाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत,पण बॉयकॉट ट्रेन्डमुळे सिनेमा बॉक्सऑफिसवर कमाल दाखवू शकलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT