Kareena Kapoor Film Heroine Unknown Facts : प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा हिरोईन नावाचा चित्रपट बराचकाळ चर्चेत होता. या चित्रपटानं बॉक्सऑफिसवर प्रचंड कमाईही केली होती. या चित्रपटातील करिनाच्या भूमिकेवरुन आणि तिच्या ड्रेसिंगवरुन मोठी चर्चा रंगली होती. भांडारकर यांच्या चांदनी बार नावाच्या चित्रपटाला देखील नुकतीच वीस वर्षे पूर्ण झाली आहेत.
मधुर भांडारकर हे त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनाच्या कौशल्यासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहे. त्यांनी आतापर्यत जेवढ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे त्या रियल लाईफ वर आधारित असल्याचे दिसून आले आहे. हिरोईन चित्रपटासाठी त्यांनी करिनाला कास्ट केले होते.या चित्रपटामध्ये करिना ही प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत होती.
Also Read -Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे
दिग्दर्शकानं एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, करिनानं हिरोईन या चित्रपटात तब्बल १३० ड्रेस बदलले होते. ज्यावेळी त्या चित्रपटाच्या बजेटविषयी बोलले जाते तेव्हा मात्र दिग्दर्शकानं करिना आणि तिच्या कपड्यांविषयीचे उदाहरण दिले होते. चित्रपटाचे अर्ध्याहून अधिक बजेट हे ड्रेसिंगसाठीच गेले होते.
करिनानं हिरोईन चित्रपटामध्ये जी वेषभूषा केली होती ती कमालीची महागडी होती. त्याची किंमत दीड कोटी रुपये एवढी होती. त्याचे कारण ती डिझाईन टॉपच्या डिझायनर्सकडून बनवून घेण्यात आले होते. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपालनं केलेली भूमिका चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. हिरोईन या चित्रपटाची कथा आणि त्यातील गाणी ही चाहत्यांना कमालीची आवडली होती.
मधूर भांडारकर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, चित्रपटाचे टायटल काय असावे याकडे मी फारच लक्ष द्यायचो. माझा पहिला चित्रपट हा फ्लॉप झाला होता. आणि माझ्या नावाची वेगळी चर्चाही सुरु झाली होती. लोकं काहीही बोलत होती. माझ्यासाठी एखादा नवीन प्रोजेक्ट घेणं हे देखील रिस्की होतं.
अशावेळी मी जर माझ्या येणाऱ्या एखाद्या नवीन चित्रपटाचं नाव बदलण्याचा विचार करायचो तर मलाच खूप भीती वाटायची. लोकांना वाटायचे मी खूपच घाबरतो आहे. चांदणी बार या नावाविषयी देखील मी खूपच घाबरलो होतो.
मला माझे ते टायटल बी ग्रेड टाईप वाटत होते. मी माझ्या चित्रपटावर सहा महिन्यापर्यत रिसर्च केला होता. माझ्यासोबतच करिनाची देखील अनेकजण टिंगल करत होते. एकदा तर मी गंमतीनं करिनाला म्हणालो होतो की, मी हिरोईन चित्रपटात कपड्यांसाठी जितका पैसा खर्च केला तेवढ्यात माझ्याकडून चांदणी बार नावाचा चित्रपट तयार केला होता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.