Kareena Kapoor OTT Debut: Kareena Kapoor, Jaideep Ahlawat, Vijay Varma's first looks out Esakal
मनोरंजन

Kareena Kapoor OTT Debut: चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर करिनानंही वळवला ओटीटीकडे मोर्चा! 'जाने जान'चा भयानक टिझर रिलिज...

Vaishali Patil

Kareena Kapoor, Jaideep Ahlawat, Vijay Varma's first looks out: बॉलिवूडची आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर ही नेहमीच चर्चेत असते. तिने आजवर अनेक वेगवेगळ्या भुमिकांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मात्र गेल्या काही दिवासांपासून तिचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करु शकलेले नाहीत. त्यात तिचा आमिर खान सोबतचा लाल सिंह चड्ढा हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला. आता करीनाने ओटीटीकडे मोर्चा वळवला आहे.

करीना कपूर खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'जाने जान'चा काही सेकंदाचा टिझर आता रिलिज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये करीना आत्तापर्यंतच्या सर्वात वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार अशी चर्चा सुरु झाली आहे.

या चित्रपटात तिच्यासोबतच जयदीप अहलावत आणि विजय वर्मा मनोरंजक भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटातून करिना ओटीटी डेब्यू करणार आहे. टिझर रिलिज करत निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट आणि नाव नेटफ्लिक्सच्या अधिकृत अकाउंटवर शेअर केले आहे.

शेयर केलेल्या या व्हिडिओत करीना मद्यधुंद आवाजात माइकवरून 'जाने जा' हे गाणं गात आहे तर दुसरीकडे विजय वर्मा कारमधून उतरताना दिसत आहे. हा एक फुल ऑफ थ्रिलर चित्रपट असणार आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलयं की, चित्रपटाचे नाव 'जाने जान' आहे. हा सिनेमा 21 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या जपानी कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमाचा ट्रेलर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होईल असा अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या सिनेमात करीना एका घटस्फोटित सिंगल मदरच्या भूमिकेत दिसेल. ती चुकून तिच्या एक्स पतीला मारते आणि शेजाऱ्याच्या मदतीने त्याला पोलिसांपासून लपवत असते.

महत्वाची बाब म्हणजे करीनाची ही वेबसीरिज तिच्या वाढदिवसालाच प्रदर्शित होणार आहे. करीना कपूर २१ सप्टेंबरला तिचा वाढदिवस साजरा करते आणि त्याचदिवशी ही सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

SCROLL FOR NEXT