Kareena Kapoor news  esakal
मनोरंजन

Kareena Kapoor: तिसऱ्यांदा प्रेग्नंट? करिना कपूरची भन्नाट प्रतिक्रिया, 'सैफनं...'

बॉलीवूडची बेबो करिन कपूर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिची प्रेग्नंसी. तिसऱ्यांदा प्रेग्नंट असणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे.

युगंधर ताजणे

Kareena Kapoor Khan: बॉलीवूडची बेबो करिना कपूर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिची प्रेग्नंसी. तिसऱ्यांदा प्रेग्नंट असणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारुन भंडावून सोडले आहे. काही दिवसांपूर्वी (Bollywood Actress) करिना पुन्हा एकदा गुड न्युज देणार अशी चर्चा होत होती. त्यात तिचे फोटो व्हायरल झाले आणि सोशल मीडियावर करिनावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. खोडकर नेटकऱ्यांनी करिनाला जे प्रश्न विचारले त्याचीही चर्चा (trending entertainment news) झाली. यासगळ्यात तिनं एक पोस्ट शेयर करुन आपल्या तिसऱ्या प्रेग्नंसीवर प्रतिक्रिया दिली आहे.

करिनानं आपण प्रेग्नंट असल्याच्या बातम्यांवर टीका केली आहे. तिनं आपण प्रेग्नंट नसल्याचे सांगत जे कोणी आपल्याला त्यावरुन ट्रोल करत आहे त्यांना फटकारले आहे. करिनानं तिच्या इंस्टावर प्रेग्नंसीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. तिनं (bollywood actor) लिहिलं आहे की, मित्रांनो पास्ता, वाईनची गंमत काही औरच आहे. मी काही प्रेग्नंट नाही. सैफनं सांगितलं आहे की, देशाची लोकसंख्या वाढवण्यात मी यापूर्वीच मोठं योगदान दिलं आहे. करिना कपूरची ती पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. तिचा तो गंमतीशीर अंदाज देखील नेटकऱ्यांना आवडला आहे.

सैफ अली खान हा अगोदरच चार मुलांचा बाप आहे. त्याच्या पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सारा अली खान आणि इब्राहीम खान अशी त्यांची नावं आहेत. तर करिनापासून त्याला तैमूर आणि जहांगीर नावाची दोन मुलं झाली आहेत. करिनाच्या पहिल्या बाळंतपणाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. विशेषत: जेव्हा करिनानं तिच्या मुलाचे नाव तैमूर आणि जहांगीर ठेवले होते तेव्हाही मोठा वाद झाला होता. जेहचा जन्म गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झाला होता.

करिनाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, ती आमीर खान सोबत लाल चढ्ढा सिंगमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होणार असून तो हॉलीवू़डच्या फॉरेस्ट गंपची हिंदी कॉपी असणार आहे. त्यामध्ये आमीरनं प्रमुख भूमिका साकारली आहे. लाल चढ्ढा सिंगच्या गाण्यांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

BMC Election Voting: १५ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर, मतदानाच्या दिवशी रजा नाकारणाऱ्या आस्थापनांवर कारवाई

Latest Marathi News Live Update : माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावरील हल्ला हा राजकीय कट; अवैध धंदेवाल्यांवर आरोप

Baba Vanga Predictions 2026: जग मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर? माणसांची निर्णयक्षमता हरवणार, पृथ्वीवर परग्रहवासी येण्याचा दावा

Aluminum Foil किंवा Container मध्ये अन्न ठेवता? जीवावर बेतेल; तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा

SCROLL FOR NEXT