Kareena Kapoor's Diwali Esakal
मनोरंजन

Kareena Kapoor's Diwali: अरे दिवाळी आहे की होळी! जेह-तैमूरसोबत करिनानं काढली रांगोळी... फोटो व्हायरल

करीना कपूरने तैमूर आणि जेहचे फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत.

Vaishali Patil

Kareena Kapoor's Diwali: सध्या सर्वत्र दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सर्व सामान्यापासून तर कलाकारांपर्यंत सर्वच आपआपल्या परिने या सणाचा आनंद घेत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरीही दिवाळी पार्टी सुरु आहे. अनेक कलाकार आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत फोटो शेयर करत आहेत.

त्यातच आता करिना कपुर देखील पती सैफ अली खान आणि आपल्या लाडक्या लेकांसोबत दिवाळी सणाचा आनंद घेत आहे. सध्या बेबोच्या घरातही दिवाळीचा उत्साह पहायला मिळत आहे.

करिनानं सोशल मिडियावर या सेलिब्रेशनचे काही फोटो शेयर केले आहे. ज्यात करिना तिच्या घरी मुलांसोबत दिवाळीची रांगोळी काढण्याची व्यस्त आहे. यावेळी जेह आणि तैमूर देखील आपल्या आईला मदत करत आहेत.

करीनाने इंस्टाग्राम हे फोटो शेअर केले आहेत. ज्यात जेहने रांगोळी काढताना सर्वत्र रंग जमीनीवर पसरवले आहेत आणि तोही रंगाने भरलेला दिसत आहे.

हे फनी फोटो शेयर करत बेबोनं एक मजेदार कॅप्शन देखील शेअर केले आहे. ज्यात तिने लिहिले की, "अय्यो, जेव्हा कुटुंबाला रांगोळी काढायची असेल… किंवा होळी खेळायची असेल , काही कल्पना नाही…पण महत्त्वाचं म्हणजे आम्ही मजा केली... उत्सव सुरू झाला आहे.. सर्वांना प्रेम.."

सध्या हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या फोटोंना पाहिल्यानंतर खुप हसत आहे. बेबोच्या पोस्टवर चाहते कमेंटचा वर्षाव करत आहेत. चाहत्यांनी तिला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करिना कपुरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती नेटफ्लिक्सच्या 'जाने जान' मध्ये दिसली होती. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या द बकिंगहॅम मर्डर्सचा प्रीमियरही झाला. आता ती रोहित शेट्टीच्या सिंघम अगेनमध्ये चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT