Kareena Kapoor Google
मनोरंजन

करिनाच्या गाडीच्या चाकाखाली 'पापाराझी' चा पाय,अभिनेत्री टेन्शनमध्ये आली

करिना कपूर अपघातात जखमी झालेल्या मलायका अरोराची विचारपूस करायला गेली असताना तिच्यासोबत हा प्रकार घडला.

प्रणाली मोरे

करिना कपूर(Kareena Kapoor)सोबत मुंबईच्या(Mumbai) रस्त्यावर असा प्रसंग घडलाय की भर रस्त्यात अभिनेत्री जोरात किंचाळली. काय घडलं नेमंक तिच्यासोबत. आता करिना कपूर रस्त्यात पापाराझीला दिसली की ते तिच्याकडे फोटोसाठी धाव घेणारंच नाही का. पण याच घाई-गडबडीत करिनाच्या गाडीच्या चाकाखाली एका पापाराझीचा पाय आला अन् तो जोरात किंचाळला. पण त्याच्याआधीच करिना आपल्या ड्रायव्हरवर जोरात डाफरली अन् ती देखील घाबरुन दुपटीनं किंचाळली. आता हे सगळं कैद झालं शूटिंगच्या व्हिडीओत अन् व्हायरल झाला नं व्हिडीओ.

या व्हिडीओत करिना ड्रायव्हरवर ओरडताना दिसत आहे की,'संभालो यार,पीछे जा यार..' हे करिना त्या पापाराझीच्या पायावर चुकून तिच्या ड्रायव्हरनं गाडी घातल्यावर बोलताना दिसतेय. अर्थात पायावर गाडी गेल्यानं पापाराझी अक्षरशः रडवेला झाला होता. त्यावेळी ड्रायव्हरला ओरडल्यानंतर करिनानं पापाराझीशी अगदी विनम्र आणि काळजीच्या स्वरात संवाद साधला. ती म्हणाली,''हे असं काही घडू शकतं म्हणून तुम्ही लोक धावत नका जाऊ''. करिनासोबत हे सगळं घडलं ते नेमकं मलायका अरोराच्या इमारतीजवळ. मलायका अरोराच्या गाडीला नुकताच मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेजवळ अपघात झाला होता. त्यात ती किरकोळ जखमीही झाली होती. तेव्हा तिची विचारपूस करण्यासाठी करिना कपूर आली असताना हा सगळा प्रकार तिच्यासोबत घडला.

करिना तशी मीडियासोबत खूपच फ्रेंडली आणि आदरानं वागताना नेहमीच दिसली आहे. ती कधीच मीडियाला फोटो काढू नका असा अॅटिट्युड दाखवत नाही. त्यामुळे तिच्या गाडीचं चाक जेव्हा पापाराझीच्या पायावर गेलं तेव्हादेखील तिचा मीडियासोबतचा व्यवहार हा काळजी करणाराच दिसून आला. करिना लवकरच आपल्याला 'लालसिंग चड्ढा' सिनेमात आमिर खानसोबत दिसणार आहे. हा सिनेमा हॉलीवूडच्या 'फॉरेस्ट गम्प' या सिनेमाचा रीमेक आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये हा सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य देखील दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT