saif kareena 
मनोरंजन

मालदीवमधील रोमँटिक फोटो पोस्ट करत करीनाच्या सैफला शुभेच्छा

सैफच्या वाढदिवसानिमित्त करीनाने प्लॅन केलं 'मालदीव व्हेकेशन'

स्वाती वेमूल

अभिनेता व पती सैफ अली खानच्या Saif Ali Khan वाढदिवसानिमित्त अभिनेत्री करीना कपूर Kareena Kapoor खानने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी तैमुर Taimur आणि जहांगीर Jahangir या दोन मुलांसह सैफ-करीना मालदीवला फिरायला गेले आहेत. मालदीव व्हेकेशनचे फोटो पोस्ट करत करीनाने सैफला शुभेच्छा दिल्या आहेत. 'माझ्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. अनंतकाळासाठी मला तुझी साथ लाभावी हीच माझी इच्छा आहे', असं करीनाने कॅप्शनमध्ये लिहित दोन फोटो पोस्ट केले आहेत.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पहिल्या फोटोमध्ये समुद्रकिनारी सैफ-करीना, तैमुर आणि जहांगीर हे निवांत बसलेले पहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये मालदीवच्या प्रसिद्ध 'इटर्निटी पूल'मध्ये सैफ आणि करीना पोहण्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. करीनाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांसोबत अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत सैफला शुभेच्छा दिल्या आहेत. 'हॅपी बर्थडे टू हमारे विभूती भैय्या', असं अभिनेता अर्जुन कपूरने लिहिलं आहे. जॅकलिन फर्नांडिस, अमृता अरोरा, मलायका अरोरा, सबा पतौडी यांनीसुद्धा सैफवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

सैफ आणि करीना ही बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असणारी जोडी आहे. या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. २००८ साली 'टशन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. १६ ऑक्टोबर २०१२ साली मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केलं. २० डिसेंबर २०१६ रोजी करीनाने तैमुरला जन्म दिला. तैमुर हा सर्वाधिक चर्चेत असलेला स्टारकिड आहे. त्यानंतर या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. सैफ-करीनाने त्यांच्या दुसऱ्या मुलाचं नाव जहांगीर असं ठेवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI च्या कारवाईचा दणका! Dabur नंतर Zandu सह ५ कंपन्यांवर कडक कारवाई; कारण काय?

Pimpalwandi News : पिंपळवंडी ग्रामस्थांचा पोलीस अधीक्षक गिल यांच्याकडे संतप्त सवाल; पिंपळवंडी येथील पोलीस आऊट पोस्ट दहा वर्षापासून बंद

Shubman Gill: "तो खेळाडू भारतासाठी दीर्घकाळ खेळेल!", श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर गिलची मोठी भविष्यवाणी!

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन आणि इतर ४ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sangola News : सांगोल्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत केला पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT