Kareena talks about askhay kumar
Kareena talks about askhay kumar 
मनोरंजन

करीना अक्षयविषयी म्हणाली 'तो पहिली व्यक्ती आहे जी...'

वृत्तसंस्था

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर खान आणि खिलाडी अक्षय कुमार यांचा आगामी सिनेमा 'गुड न्यूज' चर्चेत आहे. त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटासाठी उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट कॉमेडीची मेजवानी असणार आहे ज्यामध्ये दिलजीत दोसांज, अक्षय कुमार, करीना कपूर खान आणि कियारा अडवाणी अशी दमदार कास्ट दिसणार आहे. करीना सध्या  'गुड न्यूज' आणि 'लाल सिंह चढ्ढा' या तिच्या आगामी चित्रपटांच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. दरम्यान करीनाने अक्षय कुमारविषयी एक खुलासा केला आहे ज्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. 

करीना स्वत: सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव नसली तरी तिच्या कामामुळे ती सतत हायलाईटमध्ये असते. अक्षय आणि करीना खूप चांगले मित्र आहेत आणि करीनाच्या खुलास्यानंतर त्याता पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. करीना अक्षय विषयी बोलताना म्हणाली,'' हे खरं आहे की, अक्षय ही पहिली व्यक्ती होती ज्याला माझ्या प्रेमाविषयी माहित होतं. माझं सैफवर प्रेम आहे ही गोष्ट सर्वात आधी अक्षयलाच माहित पडली. त्याने ही गोष्ट सिक्रेट ठेवली. तो खरचं खूप चांगला मित्र आहे.' 

याला प्रतिसाद देताना अक्षयने मजेशीर उत्तर दिलं. तो म्हणाला,' मला तिने सांगितलं कारण माझा आणि सैफचा रुम एकच होता'. करीना तिच्या आणि सैफच्या रिलेशनशिपविषयी बोलताना म्हणाली,' सैफसोबत लग्न करण्याचा माझा आयुष्यातला सर्वात चांगला निर्णय होता.' 

करीना, अक्षय कुमार आणि सैफ अली खान 'टशन' या चित्रपटामध्ये एकत्र दिसले होते. त्यानंतर करीना आणि सैफ डेट करु लागले. अखेर 16 ऑक्टोबर 2012 मध्ये दोघांनी लग्न केलं. खिलाडी कुमार आणि बेबो मुख्य भूमिकेत 'गुड न्यूज' सिनेमातून दिसणार आहेत. याआधी हे दोघ 2009 मध्ये आलेल्या 'कमबख्त इश्क' या चित्रपटातून एकत्र दिसले होते. त्यानंतर  'गुड न्यूज' च्या निमित्ताने बेबो आणि अक्षय 9 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. धर्मा प्रोडक्शन या सिनेमाचं निर्देशन करीत आहे. चित्रपटाची कधा 'सरोगसी' वर आधारीत असणार आहे. याआधी 2002 मध्ये याच विषयावर मेघना गुलजार यांनी ' फिलहाल' हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. 'गुड न्यूज' चित्रपट येत्या 27 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करीना कपूर अभिनेता इरफान खानसोबत 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातही दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT