Karishma Tanna
Karishma Tanna Instagram
मनोरंजन

Karishma Tanna: नववधुचा गृहप्रवेश, सासुनं ऐनवेळी सांगितलं असं काही जे....

सकाळ डिजिटल टीम

६ फेब्रुवारीला टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) वरुण बंगेरासोबत (Varun Bangera) विवाहबंधनात अडकली आहे. अभिनेत्रीच्या लग्नाचे फोटोज व्हायरल झाले आहेत. नवीन वधूने अखेर तिच्या नवीन घरी गृहप्रवेश केला. या शुभ प्रसंगी करिश्मा गुलाबी रंगाच्या साडीत सजलेली दिसली. तिच्या सासूने तिला आपल्या मुलाचा हात धरून करायला सांगितले. ती गुलाबी रंगाच्या 'कांजीवराम' साडीत, हातावर गडद मेंदी आणि दागिन्यांमध्ये खुलून दिसत होती. वरुणने मोहरी रंगाची कॉटन शेरवानी घातली होती.

वरुण बंगेरा आणि करिश्मा तन्ना यांची भेट त्यांचा कॉमन फ्रेंड 'सुवेद लोहिया' (Suved Lohiyan) मुळे झाली. खरं तर ते दोघंही सुवेद लोहियांच्या एका पार्टीला गेले होते. तिथे त्यांची पहिल्यांदा भेट झाली. कालांतराने दोघांची मैत्री झाली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. दीड वर्ष एकमेकांना 'डेट' केल्यानंतर आता हे 'कपल' विवाहबंधनात अडकले आहे.

दोघांनी गोव्यात आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या साक्षीने लग्न (Destination Wedding) केलं. वरुण बंगेरा हा मुंबईतील बिझनेसमॅन असून तो गेले १२ वर्ष या क्षेत्रात आहे.

करिश्मा आणि वरुण या दोघांनाही जास्त चर्चेत राहायला आवडत नसल्याने, त्यांनी मिडीयासोबत फारसे बोलणे टाळले. आयुष्याच्या या नवीन वळणावर, चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. करिश्माची जवळची मैत्रिण हरलीन सेठी हिने रिसेप्शनमधील अभिनेत्रीचे अनेक व्हिडिओ शेअर केले होते.

करिश्माच्या इंडस्ट्रीतील जवळच्या मैत्रिणी, अनिता हसनंदानी (Anita Hasnandani), एकता कपूर (Ekta Kapoor), रिद्धिमा पंडित (Ridhima Pandit), दलजीत कौर (Daljeet Kaur), टेरेन्स लुईस (Terence Lewis) आदींनी लग्नाला हजेरी लावली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT